Join us

​ श्रद्धा कपूरला भेटला होता ढाका हल्ल्यातील एक अतिरेकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 19:46 IST

बांगलादेशची राजधानी ढाका येथील ताज्या अतिरेकी हल्ल्यात ठार झालेल्या सहा अतिरेक्यांपैकी एक अतिरेकी अभिनेत्री श्रद्धा कपूरलाही भेटला होता. श्रद्धाला ...

बांगलादेशची राजधानी ढाका येथील ताज्या अतिरेकी हल्ल्यात ठार झालेल्या सहा अतिरेक्यांपैकी एक अतिरेकी अभिनेत्री श्रद्धा कपूरलाही भेटला होता. श्रद्धाला भेटतानाचा त्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निब्रस इस्लाम असे या अतिरेक्याचे नाव आहे. युजर्सने त्याची ओळख करून त्याचा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर युजर्सने निब्रसचे अनेक फोटो पोस्ट केले आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलचा हवाला देत, अनेक दावे केले जात आहेत. आयएसआयएस अर्थात इसिस या अतिरेकी संघटनेनेहर ढाका हल्ल्यात सहभागी अतिरेक्यांचे छायाचित्र जारी केले आहे. यात कथितरित्या निब्रसही दिसतो आहे. निब्रस श्रद्धाला भेटला होता. या भेटीच्या व्हिडिओला त्याने ‘श्रद्धा कपूर यू ब्युटी’ असे कॅप्शनही दिले होते. निब्रस हा श्रीमंत घरातील एक उच्चशिक्षित मुलगा होता. }}}}