Join us

श्रद्धा कपूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम?, कथित बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 09:19 IST

आता श्रद्धाचा हा बॉयफ्रेंड नक्की आहे तरी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांनी लागली आहे.

श्रद्धा कपूर ही बी-टाऊनच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 'आशिकी 2', 'स्त्री', 'एक व्हिलन', 'बागी' आणि 'ABCD 2' सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. श्रद्धा अनेकवेळा आपलं वैयक्तिक आयुष्य लाईमलाईटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र यावेळी ती तिच्या पर्सनल लाईफमुळेच चर्चेत आली आहे.  श्रद्धाचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

सोमवारी रात्री श्रद्धा जुहू पीव्हीआरच्या बाहेर तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत दिसली. आता श्रद्धाचा हा बॉयफ्रेंड नक्की आहे तरी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांनी लागली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा याआधी सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. आता ही अभिनेत्री राहुल मोदीला डेट करत असल्याची बातमी आहे. 3 जुलै 2023 रोजी मुंबईत दिसलेले श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी. दोघं कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. इंटरनेटवर समोर आलेल्या फोटोंमध्ये, श्रद्धा अतिशय सिंपल लूकमध्ये दिसतेय. तिने पांढऱ्या रंगाचा कॉटनचा ड्रेस घातला होता. 

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा तिच्या 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटाचे लेखक राहुल मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. राहुलने 'तू झुठी में मक्कर'च्या आधी ‘प्यार का पंचनामा २ ‘आणि ‘सोनू की टिटू की स्वीटी’ या चित्रपटासाठीही काम केलं आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर श्रद्धा शेवटची 'तू झुठी में मक्कर' या सिनेमात दिसली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. याशिवाय लवकरच तिचा ‘स्त्री २’ या चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूर