Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:14 IST

श्रद्धा कपूरला सगळ्यांसोबत स्टॉलवर पाहून चाहतेही खूश झाले.

अभिनेत्री श्रद्धा कपूर लेखक राहुल मोदीला डेट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. श्रद्धाने आता अनेकदा राहुलवरचं प्रेम खुलेआम व्यक्त केलं आहे. नुकतीच ती बॉम्बे कॉफी फेस्टिवलमध्ये आली होती. तिथे तिने स्टॉलवर जापानी मोची चा आस्वाद घेतला. यावेळी ती सगळ्यांसमोरच राहुलला हाताने भरवले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रद्धा कपूरला सगळ्यांसोबत स्टॉलवर पाहून चाहतेही खूश झाले. ती ज्या स्टॉलवर होती तिथे तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.   राहुलसोबत ती कॉफी एन्जॉय करत होती. यानंतर तिने 'जापानी मोची'चा आस्वाद घेतला. तिला याची चव खूप आवडली. तिने आपल्या हातांनी राहुललाही भरवलं. दोघांचा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून श्रद्धाचे चाहतेही भलतेच खूश झाले.

श्रद्धा आणि राहुल यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या वर्षापासून सुरु आहे. याआधी त्यांना डिनर डेटवरही पाहिलं गेलं होतं. मागच्या वर्षी १९ जून रोजी श्रद्धाने राहुलसोबतचा फोटो पहिल्यांदाच शेअर केला होता. यासोबत तिने प्रेमाची कबुली दिली होती. श्रद्धा आता अनेकदा राहुल मोदीवर खुलेआम प्रेम व्यक्त करताना दिसते.

श्रद्धा कपूर आगामी 'ईठा' सिनेमात दिसणार आहे. 'छावा' फेम लक्ष्मण उतेकर सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर सिनेमा आधारित आहे. याशिवाय ती राहुल मोदीच्या आगामी सिनेमातही दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shraddha Kapoor feeds boyfriend Rahul Modi 'Japanese dish'; video goes viral.

Web Summary : Shraddha Kapoor is dating writer Rahul Modi. A video shows her feeding him Japanese mochi at a festival. Their cute chemistry has delighted fans. She will be seen in the movie 'Eetha'.
टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडव्हायरल व्हिडिओ