श्रद्धा कपूर व फरहान सापडले चक्क वॉशरुममध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 21:14 IST
अभिनेता फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण चुकीच्या कारणशमुळे. एक पाटीर्तील त्यांचे ...
श्रद्धा कपूर व फरहान सापडले चक्क वॉशरुममध्ये
अभिनेता फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण चुकीच्या कारणशमुळे. एक पाटीर्तील त्यांचे असे वागणे कोणलाही आवडलेलं नाहीय. पण दोघांनी नेमके असं काय केल असेल की त्यांच्या ह्या वर्तणुकीने इतरांना चचेर्चा विषय मिळाला. तर झाले असं, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या 'बागी' चित्रपटाची सक्सेस पार्टी श्रद्धाचे वडील शक्ती कपूर आणि टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनी आयोजित केली होती. त्यात बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींना आमंत्रण दिले होते. यावेळी फरहान अख्तर अवर्जुन उपस्थित होता. पार्टीत डान्स फ्लोअरवर श्रद्धा आणि फरहान दोघांनी एकत्रित पणे नृत्य केले. पण जेव्हा पार्टी संपायला तेव्हा मात्र दोघे पाटीर्तून गायब झाल्याचे निदर्शनास आले. नंतर खूप उशिराने श्रद्धा आणि फरहान दोघे एका वॉशरूममध्ये असल्याचे समजले. किमान अर्धा तास दोघे वॉशरूममध्ये काय करत होते असा प्रश्न पाटीर्तील अनेकांना पडला. दोघांनी आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशिपबाबत अजूनही कबुली दिलेली नाही. परंतु श्रद्धा कपूरमुळेच फरहान आणि त्याची पत्नी अधुना विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे.