बायोपिकपेक्षा अॅक्शन स्टार म्हणून ओळखले जावे - जॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 15:58 IST
बॉलीवूड हंक जॉन अब्राहम म्हणतो की, कोणाच्या जीवनावर आधारित सिनेमा करून वाहवाह मिळवण्यापेक्षा त्याला अॅक्शन हीरो म्हणून ओळखले जावे....
बायोपिकपेक्षा अॅक्शन स्टार म्हणून ओळखले जावे - जॉन
बॉलीवूड हंक जॉन अब्राहम म्हणतो की, कोणाच्या जीवनावर आधारित सिनेमा करून वाहवाह मिळवण्यापेक्षा त्याला अॅक्शन हीरो म्हणून ओळखले जावे.अलिकडे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत बायोपिक चित्रपटांचा सुळसुळाट आलेला आहे. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक कलाकाराला याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.जॉनने यावर उत्तर दिले की, ‘माझ्या रांगड्या लूकमुळे मला नाही वाटत की मी कोण्या ऐतिहासिक व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करू शकतो. त्यामुळे मी या भानगडीत पडतच नाही. त्याऐवजी मला जबरदस्त अॅक्शन चित्रपटात काम करायला आवडेल आणि त्या भूमिकेला मी पूर्णपणे न्याय देऊ शकतो. पण हो, बायोपिकची निर्मिती करायला मला नक्की आवडेल.’बरं तुम्हाला काय वाटते, जॉन कोणाच्या बायोपिकमध्ये काम करू शकतो?