Join us
Daily Top 2Weekly Top 5

Oscar 2021मध्ये 'जलीकट्टू'नंतर भारताची आणखी एक एन्ट्री, 'या' शॉर्टफिल्मला मिळालं नामांकन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 13:48 IST

'शेमलेस'या शॉर्टफिल्ममध्ये सयानी गुप्ता, ऋषभ कपूर आणि हुसेन दलाल या स्टार्सनी काम केलं आहे. तर कीथ गोम्सने ही शॉर्टफिल्म लिहिली असून त्याने दिग्दर्शित केली आहे.

काही दिवसांपूर्वीच ९३व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 'फॉरेन लॅंग्वेज कॅटेगरी'मध्ये भारताकडून मल्याळम सिनेमा 'जलीकट्टू'ची एन्ट्री झाली होती. आता भारतीय सिनेमा फॅन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. यावेळच्या ऑस्कर अवॉर्डसाठी 'लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म' कॅटेगरीत 'शेमलेस'ची एन्ट्री झाली आहे. याचा अर्थ 'शेमलेस'ला या खास कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे.

'शेमलेस'या शॉर्टफिल्ममध्ये सयानी गुप्ता, ऋषभ कपूर आणि हुसेन दलाल या स्टार्सनी काम केलं आहे. तर कीथ गोम्सने ही शॉर्टफिल्म लिहिली असून त्याने दिग्दर्शित केली आहे. या शॉर्ट फिल्मचा कालावधी १५ मिनिटे आहे. ही एक थ्रिलर कॉमेडी शॉर्टफिल्म आहे. याची कथा एका पिझ्झा डिलिवरी करायला आलेली मुलगी आणि घरातून काम करणाऱ्या प्रोफेशनल्सच्या जीवनावर आधारित आहे. यात दाखवण्यात आलं आहे की, टेक्नॉलॉजीने कशाप्रकारे लोकांना चुकीच्या पद्धतीने बदलून टाकलंय.

ऑस्कर नामांकन मिळालेल्या या 'शेमलेस' शॉर्टफिल्मचा दिग्दर्शक कीथ होम्स याआधी 'किक', 'हे बेबी', 'टॅक्सी नं.९२११', 'नॉकआउट', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' सारख्या सिनेमात दिसला आहे. 

दरम्यान, यावेळी ऑस्कर अवॉर्ड (Oscar 2021) २५ एप्रिल २०२१ ला आयोजित केले जाणार आहेत. कोरोनामुळे हा सोहळा दोन महिने पुढे ढकलण्यात आला आहे. याआधी भारताकडून मल्याळम सिनेमा 'जलीकट्टू' ला फॉरेन लॅंग्वेज कॅटेगरीसाठी पाठवण्यात आलं आहे. 

टॅग्स :ऑस्करआंतरराष्ट्रीयशॉर्ट फिल्म