Join us
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट ड्रेसमध्ये आजीसोबत फोटो काढणाºया सुहाना खानला यूजर्सनी सुनावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 21:23 IST

शाहरूख खानची लाडकी लेक सुुहाना खान नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. नुकताच तिने असाच काहीसा एक फोटो शेअर केला. परंतु तिला यूजर्सच्या संतापाचा सामना करावा लागला.

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान चित्रपटांमध्ये येण्याअगोदरच इंटरनेट सेनसेशन बनली आहे. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. सुहाना नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. बºयाचदा तर तिला तिच्या फोटोंवरून चाहत्यांचा मनस्तापही सोसावा लागला आहे. कारण बºयाचवेळा फोटोवरून तिला ट्रोल करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शाहरूखची पत्नी गौरी खानने आई सविता छिब्बर यांच्याबरोबर सुहाना आणि भाची आलिया छिब्बरचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. फोटोमध्ये सुहाना एका बेज कलरच्या ड्रेसमध्ये बघावयास मिळत आहे. तर तिची चुलत बहीण आलिया काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत. मात्र काही यूजर्सला या फोटोमधील सुहानाचा अंदाज अजिबातच पसंत आला नाही. सुुहानाचा फोटो बघून त्यांना एवढा त्रास झाला की, त्यांनी सुहानाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोलर्सनी सुहानाबरोबरच तिचे मॉम-डॅड शाहरूख आणि गौरीवरही निशाणा साधला. 

वास्तविक सुहानाच्या शॉर्ट ड्रेसवर यूजर्सकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आजीसमोर अशाप्रकारचा शॉर्ट ड्रेस घालणाºया सुहानाला तिच्या आई-वडिलांनी नेमके कोणते संस्कार दिले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरातील वयोवृद्ध व्यक्तींसमोर कोणी अशा कपड्यांमध्ये जात असतो काय? अशा शब्दांमध्ये सुहानावर टीका केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गौरी खानने एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान खुलासा केला होता की, तिची मुलगी सुहाना एका मॅगझीनसाठी फोटोशूट करणार आहे. मात्र यावेळी गौरीने मॅगझीनच्या नावाचा खुलासा केला नाही.