आलियाची वरुणसोबत शॉपिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 10:11 IST
दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी सारेच उत्सुक आहे. मग यात बॉलिवूड सेलिब्रेटी कसे मागे राहणार. शॉपिंग करताना मित्र जर सोबत असतील ...
आलियाची वरुणसोबत शॉपिंग
दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी सारेच उत्सुक आहे. मग यात बॉलिवूड सेलिब्रेटी कसे मागे राहणार. शॉपिंग करताना मित्र जर सोबत असतील तर शॉपिंगची आनखीच मजा येते.बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट आपल्या मित्रासोबत शॉपिंगचा चांगलाच आनंद साजरा करतेय, तिचा हा मित्र म्हणजे वरुण धवन. दोघांनी एकत्र शॉपिंग करीत चांगलीच धमाल केली. आलियाने आपल्या या शॉपिंगचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एका मॉलमध्ये दोघेही शॉपिंग क रून बाहेर आल्याचे दिसतेय. आलिया वरुणच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. तर वरुणच्या हातात अनेक पिशव्या लटकलेल्या दिसत आहेत. शॉपिंग केल्यावरचा आनंद आलियाच्या चेहºयावर चांगलाच झळकतो आहे.