Join us

‘टी३न’ च्या शूटींगवेळी विद्याच्या खोड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 11:05 IST

रिभू दासगुप्ता यांचा आगामी चित्रपट ‘टी३न’ मध्ये अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट ...

रिभू दासगुप्ता यांचा आगामी चित्रपट ‘टी३न’ मध्ये अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट तसा खुपच भावनाविवश करणारा आणि थ्रिलरपट आहे.पण जिथे खोड्या करणारी विद्या असेल त्या सेटवर वातावरण गंभीर थोडेच असणार आहे? विशेष म्हणजे तिचा रोख नवाजच्या दिशेने जास्त असायचा.नवाज शांतपणे त्याच्या सीनसाठी शूटिंग करायचा आणि विद्या त्याला मागून काहीतरी म्हणून किंवा वेडेवाकडे चेहरे करून चिडवत असायची. नवाजलाही हे कळायचे पण करणार काय? असा प्रश्न त्याला पडत असणार... चित्रपट १० जूनला रिलीज होणार आहे.