Join us

‘नूर’चे शूटिंग संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 19:11 IST

‘अकिरा’ चित्रपट रिलीज झाल्याबरोबरच सोनाक्षी सिन्हाने आगामी चित्रपट ‘नूर’चे चित्रीकरण सुरू केले. या चित्रपटातून ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून ...

‘अकिरा’ चित्रपट रिलीज झाल्याबरोबरच सोनाक्षी सिन्हाने आगामी चित्रपट ‘नूर’चे चित्रीकरण सुरू केले. या चित्रपटातून ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून ‘नूर’चे शूटिंग अलीकडेच संपले आहे. आता सोनाने तिच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा ब्रेक घेऊन फावला वेळ एन्जॉय करायला हरकत नाही. वेगवेगळ्या भूमिकांच्या शोधात असलेली सोनाक्षी हिला पत्रकाराची भूमिका अनेक दिवसांपासून करायची होती. अखेर, ती नूरच्या निमित्ताने पूर्ण झाली त्यामुळे ती प्रचंड खुश आहे. नूर या महिला पत्रकाराचे आयुष्य, तिचा झगडा यासर्व बाबींवर आधारित चित्रपटाचे कथानक असून, गेल्या काही महिन्यांपासून ती या प्रोजेक्टवर काम करत होती. तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत चित्रपटाचे शूटिंग संपल्याची बातमी जाहीर केली आहे. तिने पोस्ट केले आहे की,‘अखेर शूटींग संपले! जास्तीत जास्त वास्तववादी अभिनय करण्याचा मी प्रयत्न केलाय. पण पत्रकारांचे जीवन केवळ काही क्षण अनुभव घेण्याइतपत ठीक आहे. व्यवसाय म्हणून जर तुम्ही पत्रकार असाल तर तुमची कामगिरी खूप मोठी असते.’सुनील सिप्पी दिग्दर्शित ‘नूर’ हा चित्रपट ‘कराची, यू आर किलिंग मी’ या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटामुळे सोनाक्षीची पत्रकार होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होईल.