Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लवकरच सुरु होणार ‘काबिल’चे शुटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 10:27 IST

तुमचा आमचा आवडता हृतिक रोशन आणि ‘लव्हली डिम्पल’ गर्ल यामी गौतम ही जोडी मोठ्या पडद्यावर लवकरच एकत्र येत आहे. ...

तुमचा आमचा आवडता हृतिक रोशन आणि ‘लव्हली डिम्पल’ गर्ल यामी गौतम ही जोडी मोठ्या पडद्यावर लवकरच एकत्र येत आहे. ‘जज्बा’चे दिग्दर्शक संजय गुप्ता हे ‘काबिल’ नामक चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात हृतिक-यामी लीड रोलमध्ये आहेत.या महिन्याअखेरिस या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होत आहे. राकेश रोशन या चित्रपटाचे निर्माते आहेत. संजय यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. फॅमिलीसोबतच्या सुट्या संपत आल्या आहेत. कारण तीन आठवड्यांत ‘काबिल’ची शुटींग सुरु होतेयं. जुलैपर्यंत शुटींग चालेल, असे टिष्ट्वट त्यांनी केली. हृतिक व यामीचा हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणे अपेक्षित  आहे.