ह्रतिक रोशन विकास बहलच्या चित्रपटाच्या आधी पूर्ण करणार 'या' चित्रपटाचे शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 17:00 IST
ह्रतिक रोशन आपल्या चित्रपटांची निवड खूपच चोखखंदळपणे करतो हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणूनच त्याचे चाहत्ये त्याच्या चित्रपटाची ...
ह्रतिक रोशन विकास बहलच्या चित्रपटाच्या आधी पूर्ण करणार 'या' चित्रपटाचे शूटिंग
ह्रतिक रोशन आपल्या चित्रपटांची निवड खूपच चोखखंदळपणे करतो हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणूनच त्याचे चाहत्ये त्याच्या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत असतात. काही दिवसांपूर्वी अशी माहिती आली होती की ह्रतिक विकास बहलच्या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट बिहार मधील प्रसिध्द गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. पण ह्रतिक सध्या क्रिश4 वर लक्ष जास्त लक्ष केंद्रीत इच्छितो. याला कारण दुसरे तिसरे काही नसून विकास बहलवर लावण्यात आलेला विनयभंगाचा आरोप. एका सहकारी महिलेने त्याच्यावर गोवा ट्रिप दरम्यान विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या ह्रतिकने विकासचा 'सुपर30' थोडा लांबणीवर टाकला आहे. ह्याबद्दल हृतिकच्या निकटवर्तीय ना विचारले असता तो म्हणाले हृतिक सध्या 'क्रिश4' काम करतोय कारण 'क्रिश4' च्या स्क्रिप्टचे काम जवळ जवळ संपत आले आहे म्हणून हृतिकने पहिले हा चित्रपट पूर्ण करण्याचे ठरवले आहे. हृतिक अर्थातच वडिलांच्या प्रोजेक्टला प्रथम प्राध्यान्य देणार हे ही साहजिकच आहे. विकासवर असलेल्या या आरोपांचे त्याने खंडन केले असले तरी त्याच्या फाँटोम फिल्म्स आणि रिलाअन्स इंटरटेन्मेंट प्रोडक्शन हाऊसला त्याचा चांगलाच फटका बसला आहे. थोडक्यात काय तर हृतिक हे सगळे संपेपर्यंत तरी विकासच्या प्रोजेक्टवर काम सुरु करणार नाही असेच काहीसे दिसते आहे. ऋतिक नुकतेच ह्रदयांतर हा मराठी चित्रपटात कॅमियो केला आहे. काही दिवसांपूर्वी तो सुझैनसोबत न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसला होता.