‘ढिशूम’ ची शूटिंग संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 10:19 IST
दिग्दर्शक रोहित धवन यांच्या आगामी प्रोजेक्ट ‘ढिशूम’ ची शूटिंग नुकतीच संपली आहे. यात जॉन अब्राहम, वरूण धवन आणि जॅकलीन ...
‘ढिशूम’ ची शूटिंग संपली
दिग्दर्शक रोहित धवन यांच्या आगामी प्रोजेक्ट ‘ढिशूम’ ची शूटिंग नुकतीच संपली आहे. यात जॉन अब्राहम, वरूण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस हे या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत दिसत आहेत.त्यांनी चित्रपटासाठीचा शेवटचा सीन त्यांनी दुबईतील सबर्बन स्टुडिओ येथे शूट केला आहे. यात अॅक्शन सीन्स आणि इंटेन्स सिक्वेन्स दाखवण्यात आले आहेत. वरूणसाठी हा चित्रपट म्हणजे एक इमोशनल प्रवास असणार आहे.कारण त्याचा भाऊ रोहितच चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. वरूण म्हणतो,‘ मला सेटवर दोन भाऊ आहेत. एक जॉन आणि दुसरा रोहित. जॉन माझ्याअगोदरच सर्व स्टंट्स मी सराव करण्याअगोदरच करून टाकतो.’