Join us  

'ठग्स ऑफ हिंदुस्तान’च्या शूटिंगनंतर अमिताभ बच्चन करणार 'या' चित्रपटाचे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 8:51 AM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन जोधपूरवरुन मुंबईत परत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बी जोधपूरमध्ये ठग्स आॅफ हिंदुस्तान’चे शूट ...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन जोधपूरवरुन मुंबईत परत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बी जोधपूरमध्ये ठग्स आॅफ हिंदुस्तान’चे शूट करत होते. या चित्रपटात आमिर खान, फामिता सना शेख आणि कॅटरिना कैफची महत्त्वाची भूमिका आहे. जोधपूरमध्ये चित्रपटाचे शेवटच्या टप्प्यांमधले शूट जोरात सुरु आहे. आता ते आपला आगामी चित्रपट '102 नॉट आउट' च्या प्रमोशनमध्ये आणि दुसऱ्या प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बिग बींनी हि माहिती दिली होती. बिग बी आता 'झुंड' आणि ‘ब्रह्मास्त्र’शूटिंगला सुरुवात करणार आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आमिर व अमिताभ ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे. आमिरच्या अपोझिट सना शेख आणि कॅटरिना कैफ या दोघी आहेत. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.  102 नॉट आउटमध्ये त्यांच्यासोबत ऋषी कपूर दिसणार आहे. चित्रपटात अमिताभ यांचे वय १०२ वर्ष दाखविण्यात येणार असून, त्यांना पृथ्वीवरील सर्वांत वयोवृद्ध वक्तीचा रेकॉर्ड तोडायचा असतो, तर ऋषी कपूर त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त अभिनेते परेश रावल यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अभिनयाबरोबर एक गाणेही गायिले आहे.  अमिताभ-ऋषी यांची जोडी अखेरीस ‘अजुबा’ या चित्रपटात बघायवास मिळाली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना मेकअपसाठी तीन तास लागायचे. पुढे हे मेकअप उतरवण्यासाठी १ तास लागायचा. त्यामुळे या चित्रपटातील वयोवृद्ध पिता-पुत्राची जोडी पाहण्यास चाहते उत्सूक आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झालाय. यातील अमिताभ व ऋषीची केमिस्ट्री चांगलीच इंटरेस्टिंग आहे.ALSO READ :  ​‘या’ फोटोमुळे अमिताभ बच्चन यांना मिळाला होता नकार!