Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking : रिलेशनशिप स्टेट्सला घेऊन हे काय बोलली मलायका अरोरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 11:29 IST

बॉलिवूडची हिट आणि फिट अभिनेत्री मलायका अरोराचे रिलेशन स्टेटस सध्या जग जाहिर आहे. अरबाज खानपासून वेगळी झाल्यानंतर मलायकाने सध्या ...

बॉलिवूडची हिट आणि फिट अभिनेत्री मलायका अरोराचे रिलेशन स्टेटस सध्या जग जाहिर आहे. अरबाज खानपासून वेगळी झाल्यानंतर मलायकाने सध्या स्वत:वर लक्ष केंद्रित केले आहे. मध्ये-मध्ये ती परदेशात जाऊन व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते. अरबाजपासून वेगळी झाल्यानंतर मलायकाचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडण्यात आले होते. ऐवढेच नाही तर अर्जुनच दोघांच्या घटस्फोटामागचे कारण असल्याचे देखील बोलले जात होते.  रिपोर्टनुसार अर्जुन आणि मलायकाने हे कबुल देखील केले होते की दोघांमध्ये चांगले मित्रीचे नातं आहे.  यानंतर मलायकाचे नाव एका बिझनेसमनसोबत देखील जोडण्यात आले होते. अनेकवेळा मुंबईतल्या एका रेस्टोरेंट मालकासोबत वेळा घालवताना ती दिसली होती. नुकतीच मलायका नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये आली होती. मलायका बहिण अमृता अरोरसोबत या ठिकाणी पोहोचली होती. या चॅट शो दरम्यान नेहाने मलायकाला विचारले तो शेवटची सिंगल कधी होतीस यावर मलायकाने जे उत्तर दिले त्यांने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. मलायका म्हणाली करंटली मी सिंगल आहे. मात्र ऐवढ्यावरच ती थांबली नाही ती पुढे म्हणाली कि, ''मी प्रेमाच्या बाबतीत खूप लक्की आहे.'' मलायकाच्या दोन्ही उत्तरांमध्ये विरोधाभास दिसतो आहे. अरबाजपासून वेगळे होऊन मलायकाला अनेक महिने झाले आहे तर मग ती करंटली सिंगल कशी असेल? तसेच तिला आपण प्रेमाच्या बाबतीत लक्की आहो असे म्हणते नेमक काय सुचवायचे आहे ? मलायकाच्या या दोन उत्तरांमुळे तिच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  मलायकाने मॉडेलिंगपासून सुरुवात केली. अरबाज आणि तिची ओळख १९९३ मध्ये ‘मिस्टर कॉफी’च्या जाहिराती दरम्यान झाली होती.  ही जाहिरात एवढी बोल्ड होती, की त्यामुळे वादंग उठले होते. या वादातच मलायका आणि अरबाज यांचे सूत जुळायला सुरुवात झाली. दोघे बराच वेळ एकत्र घालवू लागले. त्यानंतर हे दोघे काही अल्बम्समध्येही झळकले. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर १९९८ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे लग्नासाठी मलायकाने अरबाजला प्रपोज केले होते. मात्र  १८ वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर मलायका व अरबाज यांनी अचानक घटस्फोटाचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.ALSO READ :  Hot Pics : मलायका अरोराचा हा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?