Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! पाकिस्तानी Tik Tok स्टारला दुबईत लाथांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:00 IST

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ठळक मुद्देहरीम गेल्या दोन महिन्यांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे.

पाकिस्तानी टिक टॉक स्टार हरीम शाह सध्या पुन्हा चर्चेत आहे. होय, दुबईत एका कार्यक्रमादरम्यान हरीम शाह लोकांनी लाथांनी मारले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.हरीमने स्वत: सोशल मीडियावर आपबीती सांगितले. नुकतीच पाकिस्तानी टिक टॉक स्टार हरीम शाह दुबईत एका मॉलच्या ओपनिंगसाठी गेली होती. येथे तिच्यासोबत ही घटना घडली.

 

‘ मी दुबईत ओसिस मॉलच्या उद्घाटनासाठी गेले होते. मला या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित केले गेले होते. येथे शेकडो पाकिस्तानी तरूणांनी मला धक्काबुक्की केली, मला शिव्या दिल्यात. काहींनी तर मला लाथांनीही मारले,’ असे तिने सांगितले. तुम्ही तुमच्या आया-बहिणींना अशीच वागणूक देता? असा सवालही तिने केला.

एका मुलाखतीत तिने याबद्दल संताप व्यक्त केला. एका महिलेसोबत अशा घटना स्वीकार्य नाहीत. पण पाकिस्तानात अशा घटनांसाठी कुठलाही कायदा नाही, असे ती म्हणाली. यापूर्वीही हरीमसोबत गर्दीने असाच प्रकार केला होता. एका कार्यक्रमात काही युवकांनी फोटो घेण्याच्या बहाण्याने तिला घेराव घातला होता. यातील एकाने तिचा हात पकडून तिच्यासोबत अश्लिल प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. हरीम गेल्या दोन महिन्यांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या फॉरेन अफेअर्स कमेटी रूममध्ये टिक टॉक व्हिडीओ बनवल्यामुळे ती वादात सापडली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. याठिकाणी हरीमला टीक टॉक व्हिडीओ बनवण्याची परवानगी कशी मिळाली? असा सवाल लोकांनी केला होता.

टॅग्स :टिक-टॉकपाकिस्तान