Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking : उर्वशी रौतेलाला दिली जिवे मारण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 21:12 IST

हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेलाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे तिला धक्का बसला असून, लोकांच्या प्रतिक्रियांमुळे ती आश्चर्यचकित झाली आहे.

आगामी ‘हेट स्टोरी-४’ ची अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही धमकी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर देण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये उर्वशीकडून बोलण्यात येत असलेल्या डायलॉगवर काही लोकांनी विरोध केला आहे. विरोध करणाºया लोकांच्या मते, उर्वशीने द्रौपदीचा अपमान केला आहे. यामुळेच तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल आतुरता लागली आहे. ट्रेलरमध्ये उर्वशी खूपच बोल्ड अंदाजात बघावयास मिळत आहे. चित्रपटात उर्वशीसोबत अभिनेता करण वाही, विवान भटेना आणि गुलशन ग्रोवर हे मुख्य भूमिकांमध्ये बघावयास मिळणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये उर्वशीने स्वत:ची तुलना द्रौपदीसोबत केली आहे. ती म्हणतेय की, ‘द्रौपदीचे तर पाच पती होते, येथे तर केवळ दोनच आहेत.’ उर्वशीच्या याच वाक्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्याचे बोलले जात आहे. एकीकडे चित्रपटातील लूक आणि डान्समुळे उर्वशीचे कौतुक केले जात असताना तिच्या या वादग्रस्त संवादामुळे चित्रपटच आता वादाच्या भोवºयात सापडताना बघावयास मिळत आहे. महाभारतात द्रौपदीचे पती पाच पांडव होते, तर या चित्रपटात उर्वशी दोन भावांबरोबर रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. सूत्रानुसार, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तिच्यावर सातत्याने विरोधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एका गटाने तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. उर्वशीला अशाप्रकारच्या प्रतिक्रिया आणि लोकांच्या रिअ‍ॅक्शनमुळे चांगलाच धक्का बसला आहे. कारण या अगोदर तिला कधीही अशाप्रकारची धमकी मिळाली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पांड्याने केले आहे. हा चित्रपट ९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हेट स्टोरी सिरीजचा हा चौथा चित्रपट आहे. या अगोदरच्या हेट स्टोरीच्या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडूनही निर्मात्यांना बºयाचशा अपेक्षा आहेत.