Join us  

SHOCKING : तामिळ अभिनेत्री वराहलक्ष्मीकडे चॅनलच्या प्रोग्रामिंग हेडने केली शरीर सुखाची मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 11:40 AM

मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंगाची घटना ताजी असताना आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आपबीती ...

मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंगाची घटना ताजी असताना आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आपबीती सांगितली आहे. ही अभिनेत्री आहे, वरालक्ष्मी सरतकुमार. एका आघाडीच्या चॅनलच्या अधिकाºयाने काही दिवसांपूर्वीच वरालक्ष्मीकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून वरालक्ष्मी या घटनेला वाचा फोडली असून अशा प्रकारांबद्दल तीव्र रोष व्यक्त केला आहे.वरालक्ष्मीने तिच्या सोशल अकाऊंटवर ही सगळी आपबीती सांगणारे एक पत्र जारी केले आहे. या पत्रात ती लिहिले,‘दोन दिवस बराच विचार केल्यानंतर मी हे पत्र लिहितेय. कारण आजकाल सोशल मीडियावर परखड बोलणाºयांनाच अनेकदा ‘चुकीचे’ ठरवले जाते. मी एका मोठ्या चॅनलच्या प्रोग्रामिंग हेडसोबत मीटिंगमध्ये होते. मीटिंग संपणार तोच आपण बाहेर कधी भेटू शकू, असे त्या व्यक्तिने मला प्रश्न केला.  अन्य कुठल्या कामासंदर्भात का? मी त्याला विचारले. यावर, नाही...नाही...एका वेगळ्या गोष्टीसाठी...असे तो हसत हसत म्हणाला. मी माझ्या रागावर शक्य तितके नियंत्रण ठेवत, त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले. यावर ,ठीक आहे तर मग सगळे संपलेय, असे म्हणत तो हसत हसत निघून गेला.वरालक्ष्मीने या व्यक्तिने नाव घेतले नाही. पण पुढे तिने अशा घटनांबद्दल फिल्म इंडस्ट्री कमालीची असंवेदनशील होत असल्याबद्दल दु:ख व्यक्त केलेय. तिने पुढे लिहिलेय की, अशा घटनांबद्दल कुणाला काही सांगितल्यावर एकच उत्तर मिळते. ते म्हणजे, या इंडस्ट्रीत या सगळ्या कॉमन गोष्टी आहेत. त्याची तक्रार काय करायची?वरालक्ष्मीचे हे पत्र सगळ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे आहे. तिचे हे पत्र तुम्हीही वाचायलाच हवे...वाचा तर...