Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशाने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 19:32 IST

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या वाटत आहे. मात्र अद्याप पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. ही घटना मालाडमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिशाच्या आई वडिलांचे स्टेटमेंट घेतले आहे.  नवभारत टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना ही माहिती मिळाली आहे की दिशा सालियन गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होती. याप्रकरणी पोलीस सध्या काहीही सांगत नाही आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दिशा बॉलिवूडमधील नामांकित पब्लिक रिलेशन मॅनेजर होती. तिने सुशांत सिंग राजपूतसोबत रिया चक्रवर्तीसोबत इतर काही सेलिब्रेटींसाठी काम केले होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सिनेइंडस्ट्रीतून लॉकडाउनमुळे काम ठप्प झाल्यामुळे या क्षेत्रात काम करणारे अनेक जणांना नैराश्यातून जावे लागत आहे. त्यात आता सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजरने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे,

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत