Join us

Shocking : युलिया वंतूरसाठी सलमान खानने तोडली संगीता बीजलानीशी मैत्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:26 IST

सलमान खान आणि युलिया वंतूरच्या नात्याबद्दल मीडियामध्ये सतत चर्चा चालू असते. पण ह्या दोघांनीही त्यांच्या  नात्याबद्दल नहेमीच मौन बाळगले.  ...

सलमान खान आणि युलिया वंतूरच्या नात्याबद्दल मीडियामध्ये सतत चर्चा चालू असते. पण ह्या दोघांनीही त्यांच्या  नात्याबद्दल नहेमीच मौन बाळगले.  युलियाने दिलेल्या आतापर्यंतच्या मुलाखतीत सलमान आणि मी एकमेकांचे चांगले मित्र आहोत असे ती सांगते. पण ताजी बातमी अशी आहे की युलियामुळे सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बीजलानी  आणि सलमान खान ह्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. एकेकाळी सलमान खान आणि संगीता बीजलानी एकमेकांनासोबत रिलेशनशीपमध्ये होते. ते दोघे लग्नसुद्धा करणार होते. मात्र काही कारणास्तव ते झाले नाही. त्यानंतर ते चांगले मित्र म्हणून एकमेकांबरोबर राहिले.आता असे सांगण्यात येते की युलिया सलमानला संगीतापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. खरं म्हणजे युलिया आणि संगीताचे एकमेकींशी पटत नाही. त्या दोघी एकाच जिममध्ये वर्कआऊट करतात पण त्यांच्यामध्ये काही कारणामुळे तू तू मै मै झाली त्यानंतर संगीताने युलियापासून तोंड फिरवले. इतकेच नाही तर संगीताने सलमानच्या फंक्शनमध्ये पण हजेरी लावणे बंद केले. सलमान खान आणि संगीता बीजलानी २०१६ मध्ये फिटनेस एक्स्पर्ट डीन पांडेच्या बर्थडे पार्टी मध्ये एकत्र दिसले होत्या त्यानंतर त्या कधी एकत्र आल्याच नाही. रिपोर्टनुसार सलमानच्या ट्यूबलाईट चित्रपटाच्या प्रीमियरला संगीता गैरहजर होती. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या अर्पिता खानच्या घरी दिवाळी पार्टीत ही ती दिसली नाही. ऐवढेच नाही तर सलमानच्या ईद पार्टीत, अरबाज खानच्या बर्थडे पार्टीला पण ती दिसली नव्हती. त्यामुळे  सलमान खान खरंच युलियासाठी संगीताशी मैत्री तोडली का?,  दोघांच्या मैत्रीतील दुराव्याचे कारण युलिया आहे का? प्रश्नांची उत्तरं सलमान युलिया आणि संगीता च देऊ शकतील. एकेकाळी सलमानच्या प्रत्येक फॅमिली  फंक्शनमध्ये संगीता आर्वजून उपस्थित असायची. सूत्रांच्या माहितीनुसार संगीताने सलमानच्या फॅमिलीमधील  सगळ्यांना सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. तसेच  सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री, अतुल अग्निहोत्री आणि अर्पिता खानला सुद्धा आपल्या अकाउंट मधून काढून टाकले आहे. त्यामुळे या सगळ्यांवरुन असेच बोलले जाते आहे की, युलिचा मुळेच सलमान आणि संगीताच्या मैत्रीमध्ये फूट पडली.