Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking...! 'सेक्रेड गेम्स'च्या या अभिनेत्रीला शिकागो एअरपोर्टवर आला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 14:56 IST

सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीला शिकागो एअरपोर्टवर एक वाईट अनुभव आला.

सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री एल्नाज नोरौजी हिला शिकागो एअरपोर्टवर एक वाईट अनुभव आला. ती ईराणी असल्यामुळे तिला अधिकाऱ्यांनी थांबवलं आणि कित्येक तास तिची चौकशी केली. या सर्व गोष्टीमुळे तिची फ्लाईट मिस झाली आणि त्यानंतर तिला पुढील फ्लाईटसाठी सहा तास वाट पहावी लागली होती.

मिड डेशी बोलताना एल्नाजने सांगितलं की, मला तीस तासाहून जास्त वेळ इमिग्रेशनमध्ये थांबवं लागलं. मला ऑफिसरनं मला कनेक्टिंग फ्लाईटमध्ये बोर्ड करण्यासाठी थांबवलं. माझ्याकडे जर्मन पासपोर्ट आहे. त्यामुळे मला युएसमध्ये ट्रॅव्हेल करण्यासाठी व्हिजाची गरज पडत नाही. मात्र मी ईराणी असल्यामुळे मी नॉर्मल व्हिजासाठी अल्पाय केलं होतं. कारण अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रंपने ईराणींवर बॅन लावला आहे. त्यांना आता ESTA मिळत नाही. त्यामुळे एअरपोर्टवर अधिकाऱ्यांना सर्व गोष्टी दोनदा चेक करून पहायच्या होत्या.

मला खूप वेळ प्रतीक्षा करायला लावली. त्यांनी मला खूप प्रश्न विचारलं. मी माझी कनेक्टिंग फ्लाइट मिस केली. पुढची फ्लाइट सहा तासानंतरची होती. त्यामुळे मला एअरपोर्टवर खूप वेळ वाट पहावी लागली. असं वाटलं की हा प्रवास कधी संपणारच नाही. मी खूप थकली होती. मात्र आता सर्व काही ठीक आहे. मी लॉस अँजेलिसमध्ये वर्क कमिटमेंटच्या शोधात आहे.

सेक्रेड गेम्स वेबसीरिजमध्ये एल्नाज नोरौजीने जोया मिर्झाची भूमिका साकारली होती. ती सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.

ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर १५ ऑगस्टला प्रसारीत होणार आहे.

टॅग्स :सॅक्रेड गेम्स