Join us

shocking!! ऋषी कपूर यांना थर्ड स्टेज कॅन्सर??

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 19:57 IST

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, कपूर कुटुंबीयांच्या निकटस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला आहे. 

अभिनेते ऋषी कपूर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. पत्नी नीतू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर त्यांच्यासोबत अमेरिकेत आहेत. याचमुळे आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारालाही ऋषी कपूर हजर होऊ शकले नव्हते. खुद्द ऋषी कपूर यांनी उपचारासाठी अमेरिकेला जात असल्याची बातमी सोशल मीडियावर  शेअर केली होती.

मी उपचारासाठी अमेरिकेत जातोय. मी लवकर परत येईल. कृपया कुठलेही तर्क काढू नये, असे ट्विट त्यांनी केले होते. अर्थात आपल्या आजाराबद्दल त्यांनी कुठलाही खुलासा केला नव्हता.पण आता ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, कपूर कुटुंबीयांच्या निकटस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला आहे. हा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याचेही कळतेय. तथापि हा कुठला कॅन्सर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बॉलिवूडबबल या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ऋषी कपूर तातडीने उपचारासाठी अमेरिकेला रवाना झालेत. अमेरिकेत ऋषी कपूर ४५ दिवसांचा उपचार सुचवले आहे. यात किमोथेरपी सेशनचाही समावेश आहे. तूर्तास नीतू आणि रणबीर ऋषी कपूर यांच्यासोबत आहे. पण लवकरच रणबीर आपल्या चित्रपटाच्या शूटींगसाठी भारतात परतणार आहे. तो परताच मुलगी रिद्धिमा कपूर अमेरिकेला रवाना होणार आहे.ऋषी कपूर यांच्या आजारपणामुळे तूर्तास जुही चावलासोबतच्या त्यांच्या एका चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.

टॅग्स :ऋषी कपूर