Shocking! ‘कास्टिंग काऊच’चा असाही एक प्रयत्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 18:06 IST
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या नावावर ‘कास्टिंग काऊच’चा प्रयत्न झाल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात विशाल यांनी पोलिसांत तक्रार ...
Shocking! ‘कास्टिंग काऊच’चा असाही एक प्रयत्न!
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या नावावर ‘कास्टिंग काऊच’चा प्रयत्न झाल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात विशाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचेही कळते. विशाल भारद्वाज ‘रंगून’नंतर अतिशय बोल्ड सिनेमा बनवणार असून यात शाहीद कपूर लीड रोलमध्ये असेल. त्याच्या अपोझिट एका तरूण अभिनेत्रीचा शोध आहे. जी पडद्यावर इंटिमेट आणि बोल्ड सीन देऊ शकेल, असे मॅसेज पाठवून बॉलिवूडमध्ये येऊ इच्छिणाºया तरूणींना फसवले जात होते. विशाल यांना एका सहकाºयाकडून ही माहिती मिळाली आणि या घटनेचे बिंग फुटले. आपल्या नावावर कुणीतरी अपकमिंग सिनेमाच्या आॅडिशनसाठी मुलींचे फोटो मागवतो आहे, हे कळल्यानंतर विशाल यांनी पोलिसांत तक्रार नोंदवणे योग्य समजले. या प्रकरणात मन कपूर नामक एका व्यक्तिचे नाव समोर आले आहे. त्याने आपल्या व्हॉट्स अप क्रमांकावर मुलींचे फोटो मागवले होते.