Shocking : 'या' अभिनेत्रीचा न्यूड व्हिडीओ झाला लीक; म्हटले हा पब्लिसिटी स्टंट नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 15:37 IST
कन्नड चित्रपट ‘दंडुपाल्या-२’ मधील एक अतिशय वादग्रस्त सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये अभिनेत्री संजना गलरानी न्यूड होताना दिसत ...
Shocking : 'या' अभिनेत्रीचा न्यूड व्हिडीओ झाला लीक; म्हटले हा पब्लिसिटी स्टंट नाही!
कन्नड चित्रपट ‘दंडुपाल्या-२’ मधील एक अतिशय वादग्रस्त सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये अभिनेत्री संजना गलरानी न्यूड होताना दिसत आहे. सुरुवातीला हा सीन चित्रपटासाठी चित्रित करण्यात आला होता, परंतु रिजनल सेन्सॉर बोर्डाने या सीनवर आक्षेप घेतल्याने, हा सीन चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा सीन लीक झाल्याने संजना चांगलीच चर्चेत आली आहे. शिवाय हा तिचा पब्लिसिटी स्टंट असल्याचीही चर्चा रंगत आहे. अशात संजनाने स्वत: पुढे येऊन हा पब्लिसिटी स्टंट नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीनिवास राजू सध्या बाहेर असून, ते आल्यानंतर त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचेही तिने म्हटले आहे. दरम्यान, आॅनलाइन लीक झालेल्या व्हिडीओमध्ये काही पोलिसवाले कारागृहात संजनाला फिजिकली टॉर्चर करताना दिसत आहेत. यादरम्यान, संजना न्यूड होताना दिसत आहे. ‘दंडुपाल्या-२’ या चित्रपटाची कथा अशा गॅँगवर आधारित आहे, जे बंगळुरूच्या ग्रामीण भागात वास्तव्य करीत असतात. या गॅँगमधील सर्वच लोक गुन्हेगारी जगताशी जोडलेले असतात. वास्तविक बंगळुरू भागात सक्रिय असलेल्या ‘दंडुपाल्या’ गॅँगशी चित्रपटाची कथा साम्य साधणारी आहे. त्यामुळे दंडुपाल्या गॅँगचे काही लोकांनी निर्मात्यांवर चित्रपटाचे नाव बदलविण्यासाठी दबावही टाकला होता. दरम्यान, न्यूड व्हिडीओ लीक प्रकरणाबाबत संजनाने बोलताना म्हटले की, ‘दंडुपाल्या-२’ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक दर्जेदार बनविण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने पब्लिसिटी करण्याची काहीही आवश्यकता नाही. संजनाच्या म्हणण्यानुसार, मी चित्रपटासाठी काही वेगळ्या पद्धतीचे शॉट दिले होते. परंतु लीक व्हिडीओमध्ये भलतेच दाखविण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. वास्तविक चित्रपटाचा सीन लीक होण्याअगोदरच संजना चर्चेत होती. कारण चित्रपटात संजनाच्या तुलनेत दुसरी अभिनेत्री पूजा गांधी हिला अधिक संधी दिली गेली. या कारणाने तिने चित्रपटाच्या प्रमोशनमधून काढता पाय घेतला होता. त्यामुळे संजनामुळे या संपूर्ण चित्रपटादरम्यानच कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाल्याने चित्रपटाला प्रेक्षकांकडून अधिक रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता आहे.