Join us

आमीरचा ‘दंगल’ साठी शॉकिंग अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:04 IST

 सलमान खानचा ‘सुल्तान’ आणि आमीर खानचा ‘दंगल’ चित्रपट सध्या खुप चर्चेत आहेत. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या  आमीर ...

 सलमान खानचा ‘सुल्तान’ आणि आमीर खानचा ‘दंगल’ चित्रपट सध्या खुप चर्चेत आहेत. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या  आमीर खानने त्याचा आगामी चित्रपट ‘दंगल’ साठी स्वत:मध्ये प्रचंड बदल घडवून आणला आहे.त्याचे वय सध्या ५० वर्षे असेल. तो चित्रपटात पहेलवान महावीर फोगट यांची भूमिका साकारतोय. त्याला दोन पहेलवान असणाऱ्या  मुली दाखवण्यात आलेल्या आहेत. चित्रपटाच्या कथेत त्याला काही महिने पहेलवानाच्या भूमिकेत दाखवण्यात आलेले आहे.तर काही दिवस अतिशय कमी जाडीच्या रूपात दाखवण्यात आले आहे. नुकताच आमीरने त्याचा शॉकिंग लुक आऊट केला आहे. त्यात आमीर एकदम माचो दिसतोय. त्याचे बायसेप्स, मसल्स, चेस्ट हे त्याने जीममध्ये अतिशय मेहनत घेऊन कमावलेले आहे हे पाहता क्षणीच दिसते आहे.