Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Shetty: बॉलिवूड हादरलं! दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 07:16 IST

Firing at Rohit Shetty's Mumbai House:बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. रात्री उशिरा झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या या प्रकारामुळे चित्रपटसृष्टीत आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

नेमकी घटना काय?

प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशिरा एक तरुण दुचाकीवरून रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर आला. ओळख पटू नये म्हणून त्याने 'हुडी' घातली होती. त्याने अचानक आपल्याजवळील बंदुकीतून बंगल्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बंगल्याच्या खिडकीच्या काचांचे नुकसान झाले आहे. गोळीबार केल्यानंतर हा तरुण दुचाकीवरून वेगाने फरार झाला.

पोलीस तपासाला वेग

घटनेनंतर जुहू पोलिसांनी रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. पोलिसांनी सध्या हा परिसर सील केला असून नागरिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच यामागे गँगस्टरचा हात आहे का? याचाही पोलीस तपास करत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

गोळीबारानंतर रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या पोलिसांच्या ताफ्याचा आणि तणावपूर्ण वातावरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Shetty's Juhu Bungalow Shot At; Bollywood in Shock

Web Summary : Unknown assailants fired at director Rohit Shetty's Juhu bungalow late Saturday, causing damage but no injuries. Police are investigating CCTV footage and questioning witnesses to identify the shooters and determine the motive, including potential gang involvement. The incident has heightened concerns about celebrity security.
टॅग्स :रोहित शेट्टीबॉलिवूड