Join us

Shocking! 'डिप्रेशनमुळे मृत्यू व्हावा...आईवर रेप व्हायला पाहिजे', आलिया भटच्या बहिणीला येताहेत असे विकृत मेसेजेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 20:40 IST

आलिया भटची बहिण शाहीन भटला विकृत मेसेज आले असून त्याचे स्क्रीनशॉट्स तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची बहिण शाहीन भट हिने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरीवर चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यात तिने सायबर हॅरेसमेंटची शिकार झाली आहे. काही लोकांची इच्छा आहे की ती डिप्रेशनमध्ये गेली पाहिजे. तर काहींनी तर तिची आई सोनी राजदान यांच्यावर बलात्कार व्हावा, असेही म्हटले. हे सर्व चॅट्स शेअर केल्यानंतर शाहीनने सांगितले की आता या सर्वांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.इंस्टाग्राम स्टोरीवर तिने बरेच पोस्ट केले आहेत. सुरूवात भारतातील महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांपासून केली. लिहिले की, भारत महिलांविरोधात होणाऱ्या लैंगिक शोषणासाठी असुरक्षित देश मानला जातो. बलात्कार भारतात होणारा सर्वात कॉमन गुन्हा आहे. प्रत्येक 15 मिनिटाला एका महिलेवर बलात्का होतो. भारतात 70 टक्के महिला घरगुती हिंसेला बळी पडतात. प्रत्येक नवव्या मिनिटाला कोणाचा नवरा किंवा नवऱ्याच्या नातेवाईक वाईट व्यवहार केला जातो. प्रत्येक तिसरी महिला घरातील लैंगिक शोषण किंवा शारिरीक हिंसेचा सामना करते. सोबतच मायक्रोसॉफ्टने ग्लोबल यूथ ऑनलाइन बिहेवियरल सर्वे केले होते. त्यात 53 टक्के रेस्पोंडेंटसोबत भारत सायबर छळवणूक करण्यात तिसऱ्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे लहान मुलांनी ऑनलाइन छळवणूकचा अनुभव आल्याचे सांगितले. दरवर्षी जगभरात जवळपास आठ लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. यात 15 टक्के म्हणजेच एक लाख पस्तीस हजार लोक भारतात राहणारे आहेत.

या पोस्टनंतर शाहीनने पुढील पोस्टमध्ये तिला आलेले स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत.

त्यातील मेसेज पाठवणाऱ्यां पैकी एकाने लिहिले की, मी आशा करतो की तु आणि तूझ्या बहिणीचा मृत्यू डिप्रेशनने व्हावा. तुझ्या वडीलांचे निधन कर्करोगाने व्हावा. तुमच्या लोकांचे प्रेत मुंग्या व सापाने खावून टाकावा. शाहीन कल्पना कर की तू पुन्हा डिप्रेशनची शिकार झाली आहेस आणि यावेळी आणखीन वाईट पद्धतीने. तू अंथरूणातून उठू शकणार नाही, काहीच बोलू शकणार नाही.

आणखीन एका व्यक्तीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट टाकला आहे. ज्या तिच्या आईवर बलात्कार व्हावा, असे लिहिले आहे.

शाहीन बरेच विकृत मेसेज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने हेही स्पष्ट केले आहे की जर कुणी विकृत मेसेज किंवा हरेंसमेंट करणारे मेसेज पाठवले तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :आलिया भटमहेश भट