Join us
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING: ‘आशिक बनया आपने’ची तनुश्री दत्ता आता दिसतेय ‘अशी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 12:02 IST

एके काळी आपल्या सौंदर्याने चंदेरी पडद्यावर आग लावणारी ही अभिनेत्री आता झगमगाटापासून दूर गेली आहे. ती सध्या कशी दिसते हे पाहून तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, तिने अल्प काळासाठी का होईना परंतु बॉलीवूड गाजविले होते. तुम्ही स्वत:च पाहा...

बॉलीवूड म्हणजे मायानगरी. येथे कोण एका रात्रीतून सुपरस्टार होईल आणि कोण एका रात्रीतून धुळीस मिळेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य करणारे सेलिब्रेटी काही काळानंतर अशी काही गायब होतात की, त्यांची आठवणही पुसून गेलेली असते. असेच एक विस्मृतीत गेलेले नाव म्हणजे तनुश्री दत्ता.एके काळी आपल्या सौंदर्याने चंदेरी पडद्यावर आग लावणारी ही अभिनेत्री आता झगमगाटापासून दूर गेली आहे. ती सध्या कशी दिसते हे पाहून तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, तिने अल्प काळासाठी का होईना परंतु बॉलीवूड गाजविले होते. तुम्ही स्वत:च पाहा...दहा-बारा वर्षांपूर्वी तनुश्री दत्ता इंडस्ट्रीमध्ये हॉट टॉपिक होती. तिच्या बोल्ड अणि सेक्सी इमेजमुळे ती चांगलीच प्रकाश झोतात आली होती. ‘आशिक बनया आपने’ या चित्रपटातून तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. ‘सिरीयल किसर’ इम्रान हाश्मीसोबतच्या अत्यंत कामुक सीन्समुळे प्रचंड वादंग निर्माण झाले होते.या चित्रपटातील तिची आणि इम्रानची केमिस्ट्री चांगलीच गाजली. २००४ साली ‘फे मिना मिस इंडिया युनिव्हर्स’ची ती विजेती ठरली होती. त्यामुळे तिला आपसूकच बॉलीवूड चित्रपटांच्या आॅफर्स मिळू लागल्या. ‘आशिक बनाया आपने’च्या यशामुळे आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान निर्माण करण्याचे तिचे स्वप्न मात्र काही पूर्ण होऊ शकले नाही.कारण त्यानंतर तिने केलेले ‘चॉकलेट’, ‘डीप डार्क सिक्रेट्स’, ‘गुड बॉय, बॅड बॉय’, ‘सास, बहू और सेनसेक्स’ अशा सुमार दर्जाच्या चित्रपटांतून ती झळकली. परंतु तिच्या करिअरने काही उडी घेतली नाही. ‘रामा: द सेव्हिएर’ (२०१०) हा तिचा शेवटचा चित्रपट होता.