Join us

Shocking!, अजय देवगणच्या लेकीला मुंबईत आला वाईट अनुभव, खुद्द काजोलनेच केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 11:16 IST

अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासादेखील लोकप्रिय स्टारकिड पैकी एक आहे. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत त्यांची मुलेदेखील चर्चेत येत असतात. ते कलाकार नसले तरीदेखील त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा फॅन फॉलोव्हिंग खूप असतो. अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासादेखील लोकप्रिय स्टारकिड पैकी एक आहे. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र न्यासाला अभिनेत्री होण्याआधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.  

न्यासाला नेहमीच तिच्या वर्णभेदावरून आणि ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. न्यासा सध्या मुंबईत नसून ती सिंगापूरमध्ये शिक्षण घेते आहे. ती सिंगापूरच्या दक्षिण पूर्व आशियाच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकते आहे. एका मुलाखतीत काजोलने मुलीला एवढ्या दूर पाठविण्या मागचे कारण सांगितले आहे. 

याबाबत काजोल म्हणाली, 'सेलिब्रिटी असल्यामुळे तिच्या आयुष्यावर परिणाम होईल.' मुंबईत न्यासाला अनेक धक्कादायक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. जेव्हा ती मुंबईत येते तेव्हा तिला पूर्ण सुरक्षेसोबत आम्ही बाहेर पाठवतो. कारण तिच्यासोबत काही गोष्टी घडल्या असल्याचा खुलासा काजोलने केला.

न्यासा सध्या सिंगापूरमध्ये राहात आहे. काजोल आणि अजयने मुलीला राहण्यासाठी सिंगापूरमध्ये एक घर देखील विकत घेतले आहे. २०१८ साली दोघे घर खरेदी करण्यासाठी सिंगापूरमध्ये गेले होते. कॉलेजमध्ये न्यासाला राहण्यासाठी पूर्ण सोय आहे. पण न्यासाला गर्दी आवडत नसल्यामुळे तिच्यासाठी घर खरेदी केले आहे. 

टॅग्स :अजय देवगणकाजोल