Join us

Shocking​!! आदित्य पांचोलीला धमकीचे फोन; मागितले २५ लाख रुपए!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 10:51 IST

अभिनेता आदित्य पांचोली चित्रपटांपेक्षा कायम वेगळ्याच कारणांनी चर्चेत असतो. सध्या आदित्यबद्दल अशीच एक बातमी आहे. होय, आदित्यला धमकीचे फोन ...

अभिनेता आदित्य पांचोली चित्रपटांपेक्षा कायम वेगळ्याच कारणांनी चर्चेत असतो. सध्या आदित्यबद्दल अशीच एक बातमी आहे. होय, आदित्यला धमकीचे फोन व मॅसेज येत आहेत. धमकी देणा-याने आदित्यकडे २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.आदित्यने याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुन्ना पुजारी नामक व्यक्तीकडून आपल्याला धमकीचे फोन व मॅसेज येत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. मुंबईच्या ठाणे आणि उत्तर प्रदेशातील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या क्रमांकावरून हे फोन येत आहेत. धमकी करणाºयाने आदित्यला त्याचा बँक अकाऊंट क्रमांकही दिला आहे.  मुन्ना पुजारी नामक इसमाने यापूर्वीही अनेकांना धमकीचे फोन व मॅसेज केले आहेत. चर्चा खरी मानाल तर मुन्ना पुजारी आता देश सोडून कुठेतरी दूर स्थायिक झाला आहे.ALSO READ: आदित्य पांचोलीने कंगना राणौतला दिले खुले आव्हान; गुन्हा दाखल केला असेल तर एफआयआरची कॉपी दाखव!याचवर्षी मार्च महिन्यात एका व्यक्तीने दिग्दर्शक महेश भट्ट यांना फोन करून त्यांची मुलगी आलिया भट्ट आणि पत्नी सोनी राजदान या दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर या धमकी देणाºया व्यक्तीस अटक करण्यात आली होती. या आरोपीचे नाव संदीप साहू होते. त्याने महेश भट्ट यांना फोन करून ५० लाख मागितले होते. उत्तर प्रदेशात राहणारा संदीप साहू टेलिव्हिजनवर काम मिळण्याच्या शोधात मुंबईत येत जात असायचा. पण त्याला काम मिळाले नाही. मग त्याच्या डोक्यात महेश भट्ट यांना धमकीचे फोन करून त्यांच्याकडून खंडणी  उकळण्याची कल्पना आली. इंटरनेटवर महेश भट्ट यांचा नंबर शोधून त्याने त्यांना धमकीचे फोन व मॅसेज करणे सुरु केले होते.