Join us

अरजित सिंगच्या 'पसुरी नु' गाण्यावर शोएब अख्तरची खोचक रिॲक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 21:15 IST

पसुरी नु गाण्याच्या प्रदर्शनानंतरच हे गाणं आणि गाण्याचे निर्माते ट्रोल होत आहेत.

इस्लामाबाद - अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी रुपरे पडद्यावर एकत्र आली असून सत्यप्रेम या चित्रपटातील एक गाणं सध्या चांगलंच चर्चेत आहे. सन २०२२ च्या सुपरहीट पसूरी गाण्याचा हा रीमेक असून अरजित सिंगने हे गाणं गायलं आहे. त्यामुळेच, माजी क्रिकेटर शोएब अख्तरनेही पसूरी या गाण्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

पसुरी नु गाण्याच्या प्रदर्शनानंतरच हे गाणं आणि गाण्याचे निर्माते ट्रोल होत आहेत. ओरिजनल गाण्याला पसंत करणारे अरजित सिंगच्या या नवीन वर्जनला ऐकताच ट्रोल करत आहेत. त्यातच, आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरनेही पसुरी नु या गाण्याला ट्रोल केल्याचं दिसून येतंय. शोएबने ट्विटवरुन गाण्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. 

पसुरीचं ओरिजिनल गाणं हे पाकिस्तानचे गायक अली सेठी आणि शे गिल यांनी गायलं आहे. तर, कोक स्टुडिओने यांस प्रेझेंट केलं आहे, त्यामुळे पसुरीच्या रिमेकवर पाकिस्तानातूनही सातत्याने कमेंट येत आहेत. आता, शोएब अख्तरने ट्विट करुन मजेशीर कमेंट केली आहे. ए क्या पसुरी पाई ये म्हणजे हे काय संकट आहे, अशा शब्दात शोएब अख्तरने ट्विटवरुन पसुरीच्या रिमेकवर कमेंट केली आहे.    

शोएबच्या या ट्विटवर नेटीझन्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. पाकिस्तानच्या पसुरीचा पसुरा केलाय, अशा शब्दात एका ट्विटर युजर्सने कमेंट केलीय. दरम्यान, सत्यप्रेम हा चित्रपट आज रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित करण्यात आलाय. समीर विद्वांस यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून साजिद नाडियावालाने निर्मित्ती केली आहे.  

टॅग्स :शोएब अख्तरकियारा अडवाणीकार्तिक आर्यन