Join us

​‘बाहुबली2’च्या शिवगामीने ‘या’ बॉलिवूड स्टार्ससोबत केलाय रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 12:23 IST

भल्लाळदेवच्या आईची भूमिका साकारणा-या राम्या कृष्णनने ‘बाहुबली2’त दमदार अभिनय केला आहे. हे तर झाले ‘बाहुबली२’बद्दल. पण राम्याने बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्ससोबत काम केलेय, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. राम्याने कुण्या बॉलिवूड स्टार्ससोबत रोमान्स केला, हेच याठिकाणी जाणून घेऊ यात.

‘बाहुबली2’ची अभूतपूर्व घोडदौड सुरु अजूनही थांबलेली नाही. आत्तापर्यंत या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने रविवारपर्यंत ३२७ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका  चित्रपटाचा प्राण आहे. भल्लाळदेवच्या आईची भूमिका साकारणाºया राम्या कृष्णनचे म्हणाल तर तिने दमदार अभिनय केला आहे. राम्याचा हा अभिनय निश्चितपणे प्रशंसनीय आहे. मुलांसाठी कुठल्याही दिव्यातून जाण्यास तयार असणाºया शिवगामीच्या भूमिकेला राम्याने असा काही न्याय दिला की, खचितच तिच्याइतका न्याय कुणी अन्य अभिनेत्री देऊ शकली असती. आता हे तर झाले ‘बाहुबली२’बद्दल. पण राम्याने बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्ससोबत काम केलेय, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. राम्याने कुण्या बॉलिवूड स्टार्ससोबत रोमान्स केला, हेच याठिकाणी जाणून घेऊ यात.अमिताभ बच्चनसन १९९८ मध्ये आलेल्या ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटात राम्या अमिताभ यांच्या अपोझिट दिसली होती. या चित्रपटातील अमिताभ व राम्याची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली होती. या चित्रपटात गोविंदा व रविना टंडन हेही मुख्य भूमिकेत होते.विनोद खन्नाविनोद खन्ना यांच्यासोबत राम्याने १९९३ मध्ये आलेल्या ‘परंपरा’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात राम्या व विनोद खन्ना यांची जबरदस्त आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली होतीी. या चित्रपटात सुनील दत्त यांच्यापासून आमिर खान, सैफ अली खान, अनुपम खेर,  रवीना टंडन अशी भली मोठी स्टारकास्ट होती.ALSO READ : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला आॅफर केली होती, ‘बाहुबली’मधील शिवगामीची भूमिका!जॅकी श्रॉफ१९९७ मध्ये आलेल्या ‘शपथ’ या चित्रपटात राम्या जॅकी श्रॉफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली होती. यात चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, कादर खान, शक्ती कपूर असे दिग्गज होते. या चित्रपटातील एका गाण्यात राम्याचा हॉट अंदाज तुम्ही पाहायलाच हवा.शाहरूख खान शाहरूख खानसोबतही राम्याने आॅनस्क्रीन रोमान्स केला आहे. अर्थात हिरोईन म्हणून नाही. ‘चाहत’ चित्रपटात शाहरूखच्या अपोझिट पूजा भट्ट दिसली होती. या चित्रपटात राम्याने शाहरूखसोबत स्क्रिन शेअर केली होती. चित्रपटातील एका गाण्यात राम्या  शाहरूखला मोहीत करताना दिसली होती.गोविंदाडेव्हिड धवनच्या ‘बनारसी बाबू’ या चित्रपटात गोविंदासोबत राम्याने अनेक ठुमके लावले होते. १९९७ मध्ये आलेल्या या चित्रपटाला एक गाणे चांगलेच गाजले होते.