शायर, गीतकार नक्श लायलपूरी कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 21:46 IST
उर्दू शायर, कवी आणि हिंदी चित्रपटातील गीतकार नक्श लायलपूरी यांचे रविवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. मागील काही ...
शायर, गीतकार नक्श लायलपूरी कालवश
उर्दू शायर, कवी आणि हिंदी चित्रपटातील गीतकार नक्श लायलपूरी यांचे रविवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. मागील काही काळापासून ते आजारी होते. त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फाळणीपूर्व भारतातील व सध्या पाकिस्तानातील पूर्व पंजाब प्रांतामधील लायलपूरी या गावी त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला. नक्श लायलपूरी यांचे मूळ नाव जसवंत राय शर्मा असे होते. ऊर्दू शायरी व कविता करणाºया नक्श लायलपूरी यांनी १९४० च्या दशकात त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी मुंबईकडे प्रस्थान केले. बरेच वर्ष संघर्ष केल्यावर १९५२ मध्ये त्यांना पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे ते गीतकार होते. मात्र तब्बल १८ वर्षांनी लायलपूरी यांना प्रसिद्धी मिळू लागली. मुंबईत आल्यावर लायलपूरी यांना अतिशय खडतर प्रसंगांचा सामना करावा लागला. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांनी काही दिवस डाक विभागातही काम केले. हिंदी सिनेसृष्टीतील त्यावेळचे आघाडीचे दिग्दर्शक, संगीतकार आणि गायकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. रॉमेंटिक आणि भावूक गाण्यांनी लायलपूरी यांनी संगीतप्रेमींची दाद मिळवली होती. आजही त्यांची गाणी आवडीने एैकली जातात. ‘मे तो हर मोड पर’, ‘ना जाने क्या हूआ जो तुने छू लिया’, ‘दो दिवाने शहर मे’ अशा एका पेक्षा एक गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या मनात स्थान पटकावले होते. १९९० च्या दशकात लायलपूरी यांनी सिनेसृष्टीतून निवृत्ती स्वीकारली होती. यानंतर त्यांनी मालिकांसाठी गाणी लिहायला सुरुवात केली होती. मात्र त्यांनी २००५ ते ०६ च्या सुमारास त्यांनी ताजमहाल या चित्रपटातून पुनरागमन केले होते.