Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शिल्पा शिकवणार Healthy Recipes!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 19:54 IST

शिल्पा शेट्टी ही फिटनेसबाबत किती जागृत आहे, हे तुम्ही जाणताच. अगदी अलीकडे तिचे ‘दी ग्रेट इंडियन डाएट’ हे पुस्तकही ...

शिल्पा शेट्टी ही फिटनेसबाबत किती जागृत आहे, हे तुम्ही जाणताच. अगदी अलीकडे तिचे ‘दी ग्रेट इंडियन डाएट’ हे पुस्तकही आले. या पुस्तकात शिल्पाने पौष्टिक खाद्य पदार्थांबाबत माहिती दिली होती. पण आता शिल्पा वेगवेगळ्या पौष्टिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी आपल्यासोबत आॅनलाईन शेअर करणार आहे. होय, शिल्पा तिच्या घरी जे पौष्टिक पदार्थ बनवते, त्या सर्व खाद्य व्यजंनांची रेसिपी ती आॅनलाईन शेअर करणार आहे. येत्या आक्टोबरमध्ये दिवाळीदरम्यान आठवड्यात तीन दिवस अशा १२ रेसिपी ती शेअर करणार आहे. केवळ एवढेच नाही तर यावेळी चाहत्यांच्या अनेकविध प्रश्नांना उत्तरेही देणार आहे. तेव्हा शिल्पाकडून आॅनलाईन रेसीपी शिकण्याची संधी कॅश करायलाच हवी. होय ना!!