Join us
Daily Top 2Weekly Top 5

आप जैसे लोग इतिहास बदलते है! शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:20 IST

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा ( Shilpa Shetty Kundra ) हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र लिहिले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा ( Shilpa Shetty Kundra ) हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र लिहिले आहे. अयोध्या येथे झालेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं विशेष कौतुक करणारे हे पत्र आहे आणि त्यात तिने पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे. शेकडो वर्षांचे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न साकार केल्याबद्दल शिल्पाने पंतप्रधानांच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक केले.  

शिल्पाने लिहिले की,''आदरणीय मोदी जी, काही लोकं इतिहास वाचतात, काही लोकं इतिहासातून शिकतात, परंतु तुमच्यासारखी लोकं इतिहास बदलतात.. तुम्ही राम जन्मभूमिचा पाचशे वर्षांचा इतिहास बदलून दाखवला. मनापासून तुमचे आभार... या शुभकार्यासोबत, प्रभु श्री राम यांच्या नावासोबत, तुमचं नाही कायमचं जोडलं गेलं आहे. नमो राम, जय श्री राम !  अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या भव्य सोहळ्याला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कॅटरिना कैफ, अनुपम खेर, विवेक ओबरॉय, हेमा मालिनी, रोहित शेट्टी, माधुरी दिक्षित नेने, राजकुमार हिराणी आणी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थित होते.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीनरेंद्र मोदीअयोध्याराम मंदिर