Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टी पूजेसाठी पोहोचली अनिल कपूरच्या घरी, फोटोग्राफर्सला म्हणाली - थांबा, जवळ नका येऊ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 17:00 IST

शिल्पाला बघताच तिथे लगेच फोटोग्राफर्सही पोहोचले.  पूजेची थाळी सांभाळत ती फोटोग्राफर्सना म्हणाली की, थांबा थांबा, जवळ येऊ नका.

करवा चौथनिमित्ताने रवीना टंडन आणि नीलम कोठारीसारख्या इतरही काही बॉलिवूड अभिनेत्री पूजा करण्यासाठी अनिक कपूरच्या घरी एकत्र आल्या होत्या शिल्पा शेट्टीही करवा चौथची पूजा करण्यासाठी अनिक कपूरच्या घरी पोहोचली होती. यावेळचा तिचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती कारमधून उतरताना दिसत आहे. शिल्पाला बघताच तिथे लगेच फोटोग्राफर्सही पोहोचले.  पूजेची थाळी सांभाळत ती फोटोग्राफर्सना म्हणाली की, थांबा थांबा, जवळ येऊ नका.

शिल्पा शेट्टीचा या व्हिडीओ करवा चौथचा लूकही बघण्यासारखा आहे. लाल साडीत ती फारच सुंदर दिसत आहे. व्हिडीओत बघायला मिळत आहे की, ती कारमध्ये पूजेची थाळी घेऊन उतरत आहे आणि ती सांभाळतच ती फोटोग्राफर्सना म्हणते की, थांबा.. जवळ येऊ नका प्लीज. यानंतर ती गेटवरच फोटोग्राफर्सना फोटो क्लिक करायला पोज देते. त्यानंतर ती पूजेची थाळी घेऊन आत जाते. शिल्पा शेट्टीसोबत रवीना टंडन, माहिप कपूर, नीलम कोठारी हेही कलाकार तिथे दिसतात.

काही बॉलिवूड स्टार साडीत दिसत आहेत तर काही अभिनेत्री सूटमध्ये दिसत आहे. दोन्ही पारंपारिक ड्रेसमध्ये त्यांचा लूक कमाल दिसत आहे. तेच शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर तिने नुकतंच हंगामा २ सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये बऱ्याच वर्षांनी परत येणार आहे. त्यासोबतच शिल्पा शेट्टी 'निकम्मा' सिनेमातही दिसणार आहे.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूड