Join us
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीरामाचा जयघोष करत शिल्पा शेट्टीनं मंदिरात जाऊन घेतलं दर्शन; पण 'या' कारणाने झाली ट्रोल, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:05 IST

सर्वांची लाडकी शिल्पा शेट्टी नेटकऱ्यांच्या रडारवर का आली, असं काय घडलं?

अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम अखेर संपन्न झाला आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याच कार्यक्रमासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. तर अयोध्येला पोहोचू न शकलेले सेलेब्स मुंबईत  रामभक्तीत तल्लीन झालेले दिसले. काही स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्राण प्रतिष्ठाचा आनंद व्यक्त केला, तर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेमुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रत्येक सण उत्सव साजरा करते. ती अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठाला पोहोचू शकली नाही, पण मुंबईत राहून हा दिवस साजरा केला.  शिल्पानं सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी ती रामभक्तीत पूर्णपणे तल्लीन झालेली दिसली. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ती राम ध्वज फडकावत 'जय श्री राम'चा जयघोष करताना दिसत आहे.

यावेळी शिल्पानं केशरी साडी परिधान केली होती. तिनं डोके टेकवून मंदिरात दर्शन घेतलं. पण, दर्शन घेताना शिल्पानं आधी साडीचा पदर पसरवला आणि त्यावर डोकं ठेवलं. यावरुन तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  एका यूजरने लिहिलं की, 'मंदिरातही स्वच्छता आवश्यक आहे, मग येथे आली कशाला'.  मात्र, काही युजर्सनी 'जय श्री राम' लिहून शिल्पाचं कौतुक केलं.

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती  रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसिरीजमध्ये झळकली आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय शिल्पाने 'केडी - द डेव्हिल' देखील साइन केले आहे. ज्यामध्ये ती सत्यवतीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ध्रुव सर्जा, शिल्पा शेट्टी, व्ही रविचंद्रन आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत.

टॅग्स :शिल्पा शेट्टीसेलिब्रिटीमुंबईराम मंदिरअयोध्या