Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासू- सासऱ्यांसोबत असे आहे शिल्पा शेट्टीचे बॉन्डींग, पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 11:41 IST

‘हंगामा 2’ सिनेमातून शिल्पा शेट्टी रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात शिल्पासोबत परेश रावल, मीझान जाफरी , आशुतोष राणा , राजपाल यादव आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. लग्नानंतर शिल्पा संसारत रमली तिच्या सगळ्या घडामोडी ती चाहत्यासंह शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या मुलांसह कुटुंबासह अनेकदा क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असते. शिल्पा आज दोन मुलांची आई आहे. २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केल्यानंतर शिल्पा कोणत्याही सिनेमात झळकली नसली तरी, टीव्ही रिएलिटी शोमध्ये परिक्षक ती झळकते. शिल्पाही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. अनेकदा राज कुंद्रा पहिल्या लग्नामुळे चर्चेत असतो. त्याचपाठोपाठ आता शिल्पा शेट्टीही चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या सासु सासऱ्यांसह असलेल्या बॉन्डींगमुळेच तिची चर्चा होत आहे. 

कार्यक्रमातच तिने याविषयी खुलासा केला. तिने सांगितले की, सासू- सासऱ्यांकडून अनेकदा शिल्पालाही ओरडा मिळतो. कधी -कधी मुलांकडून आपण जास्तच अपेक्षा करतो. पालक म्हणून मुलांना सगळंकाही यावं अशी आपली अपेक्षा असते पण मुलांचे विश्व वेगळे असते हे समजून घेण्यात आपण कमी पडतो. याच कारणामुळे आमच्या घरात यावर अनेकदा सासू सासरे मला बोलतात. लहान मुंल इतकं छान डान्स करताना दिसतात. यावयातले त्यांचे टॅलेंट पाहून त्यांच्यावर जज म्हणून त्यांच्या चुका शोधून शोधून सांगत असतो या गोष्टी सासु सा-यांना अजिबात आवडत नसल्याचे तिने सांगितले. 

विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीचे तिच्या सासू- सासऱ्यांसोबत खूप चांगले नाते आहे. शिल्पा नेहमी तिच्या सोशल मीडियावर सासूसोबतचे मेजशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ फोटो शेअर करताना दिसते. यातूनच दोघांमधले बॉन्डिंग दिसून येतं. खूप मोठ्या ब्रेकनंतर शिल्पा सिनेमात झळकणार आहे. ‘हंगामा 2’ सिनेमातून शिल्पा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात शिल्पासोबत परेश रावल, मीझान जाफरी , आशुतोष राणा , राजपाल यादव आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.  

टॅग्स :शिल्पा शेट्टी