Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीच्या मुलीचा क्युट व्हिडीओ, बाललीला कॅमे-यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 18:09 IST

शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फिटनेस फंडे चाहत्यांना सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योगा करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते.

बॉलीवुडमध्ये स्टार किड्सची चर्चा होणं काही नवं नाही. मग सुपरस्टार्सच्या मुला-मुलींची बॉलीवुडमध्ये एंट्री असो किंवा त्यांचं खासगी जीवन. त्यांच्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. या सगळ्या स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. आता तैमूरनंतर शिल्पा शेट्टीच्या मुलीची चर्चा अधिक रंगत आहे. सरोगसीच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी दुस-यांदा आई बनली होती. मुलीच्या जन्मापासूनच  बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा रंगल्या होत्या. शिल्पाने मुलीचे नाव समीशा ठेवले आहे.

आपल्या लाडक्या मुलीचे पुरवण्यासाठी शिल्पा आणि राज कुंद्रा  काहीही करायला तयार असतात. त्यामुळे समिशा बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय.  सध्या शिल्पा कुटुंबियासोबत गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. निवांत राज कुंद्रा बसलेत मुलीसह खेळताना एक व्हिडीओ समोर आला आहे. जसे जसे राज करतोय अगदी त्यांची कॉपी समीशा करतेय. तसेच तिचा बालहट्ट असा काही आहे की तिला सांभाळणारी केअरटेकरलाही कडेवर पकडणे  कठीण झालं होतं. समीशाच्या याच बाललीलांचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. समीशाचा हा क्युट व्हिडीओवर चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे.

शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फिटनेस फंडे चाहत्यांना सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योगा करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते.समीशा जेव्हा तीन महिन्याची झाली तेव्हा मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करुन तिने समिषा तीन महिन्यांची झाली असं सांगितलं  होते मात्र तो पर्यंत तिने समीशाचा चेहरा दाखवला नव्हता. 

दरम्यान, समिषाचा जन्म १५ तारखेला झाला असून १५ हा आकडा शिल्पासाठी खास असल्याचं तिने अलिकडेच सांगितलं होतं. ‘१५ नंबर माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण १५ फेब्रुवारीला माझ्या मुलीचा जन्म झाला. १५ एप्रिलला ती दोन महिन्यांची झाली आणि त्याच दिवशी माझे टिक-टॉकवर १५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत,’ असं शिल्पा म्हणाली होती.

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी