Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शिल्पा शेट्टी व राज कुंद्राचा संताप अनावर...ठोकला १०० कोटींचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 12:17 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या दोघांचे नाव गेल्या काही दिवसांपासून एका फसवणुकीच्या आरोपांवरून चर्चेत आहे. ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या दोघांचे नाव गेल्या काही दिवसांपासून एका फसवणुकीच्या आरोपांवरून चर्चेत आहे. आता या प्रकरणाला एक वेगळे वळण आले आहे. होय, शिल्पा व राज कुंद्रा यांनी एका व्यापाºयावर १०० कोटी रूपयांचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला आहे.  काही दिवसांपूर्वीच या व्यापाºयाने  शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात २४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. रवि मोहनलाल भलोटिया असे या व्यापा-याचे नाव आहे. आता भलोटियाविरोधात  शिल्पा व राजने अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. शिल्पा, राज कुंद्रा यांनी अन्य तिघांसोबत मिळून  (दर्शित इंद्रवदन शाह, उदय कोठारी, वेदांत बाली)आपल्याला २४ लाखांचा गंडा घातल्याचा कापड व्यापारी रवि मोहनलाल भलोटिया याचा आरोप आहे. या सर्वांनी मिळून आपल्या नावाने पैसे घेतले खरे पण, ते पैसे काही आपल्यापर्यंच आलेच नाहीत, असा आरोप भलोटियाने केला होता. इतकेच नाही  राज आणि शिल्पा यांच्याबद्दल जाहिररित्या काही अपशब्द आणि अपमानास्पद वक्तव्य केली होती. काही दिवसांपासून हे प्रकरण बरेच चर्चेत आहे.ALSO READ : भांग पिलेल्या शेल्पी शेट्टीचा ‘नागीण’ डान्स तुम्ही पाहिला का? शिल्पा शेट्टी व उद्योगपती राज कुंद्रा या दाम्पत्याने ‘बेस्ट डील’ कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात देशभरातील अनेक व्यापा-यांना फसवले असल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा व राजने व्यापा-यांना सुमारे १८ कोटी रुपयांनी गंडा घातल्याचा संशय आहे. पोलीस चौकशीत खरी माहिती बाहेर येईल, असे भलोटिया म्हणाला होता. या पार्श्वभूमीवर  राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत भलोटियाविरोधात १०० कोटींचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला आहे.