Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर? अभिनेत्रीच्या मित्राने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 20:58 IST

राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला १९ जुलैला पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणात अटक करण्यात आली. त्याच्यावर अश्लील फिल्म बनवणे आणि अॅपवर अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आणि तिच्या कुटुंबावर खूप टीका करण्यात आली. आता असे वृत्त समजते आहे की शिल्पा राज कुंद्रापासून विभक्त होण्याचा विचार करते आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, राज कुंद्रावर झालेल्या कायदेशीर कारवाईमुळे शिल्पाला नाहक त्रास होतो आहे. शिल्पाच्या एका मित्राने तिच्या घरातील खासगी निर्णयांबद्दल मोठा खुलासा केला आहे.

त्याने सांगितले की, राज कुंद्रा अशाप्रकारे काही गैरमार्गाने पैसे कमावत असल्याचा शिल्पाला अंदाजही नव्हता. त्यामुळे शिल्पाला आता पती राज कुंद्राने दिलेल्या भेटवस्तूंना हात लावण्याचीही इच्छादेखील होत नाही. तो मित्र पुढे म्हणाला की, शिल्पा आता आत्मनिर्भर असून ती आपल्या मुलांचे संगोपन करु शकते.

शिल्पाने सिनेइंडस्ट्रीतील आपल्या ओळखीच्या लोकांना सांगितले आहे की, ती हंगामा २ आणि निकम्मा चित्रपटांनंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे. अशातच दिग्दर्शक अनुराग बसु आणि प्रियदर्शन यांनी आगामी प्रोजेक्टमध्ये शिल्पा शेट्टीला ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिल्पाकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

राज कुंद्राला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टीने हातात असलेले सर्व प्रोजेक्ट थांबवल्याची माहिती समोर आली होती. सुपर डान्सर चॅप्टर ४ मधूनही ती बाहेर पडल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने शोमध्ये कमबॅक केले आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा