Join us

​ ब्रेकअपच्या बातमीने संतापला शिल्पाचा राज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 20:14 IST

शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्यात काहीतरी बिनसल्याची बातमी मध्यंतरी आली. यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप होणार, इथपर्यंत बातमी ...

शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्यात काहीतरी बिनसल्याची बातमी मध्यंतरी आली. यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप होणार, इथपर्यंत बातमी पोहोचली. शिल्पा व राज यांच्यात भांडण झाले असून गेल्या १५ दिवसांपासून राज आपल्या आॅफिसातच राहतोय, असे वृत्त एका आॅनलाईन पोर्टलने दिले होते. पण असे काहीही नाही. कारण काल शुक्रवारीच राज व शिल्पा यांनी मस्तपैकी डिनर डेट एन्जॉय केली. शिवाय ब्रेकअप वगैरे काहीही नाही, असे खुद्द राजनेच स्पष्ट केले.   तर  . मी कामात अत्यंत बिझी असतो. त्यामुळे शिल्पाला वेळ देऊ शकत नाही. कदाचित शिल्पाने ही नाराजी आपल्या मित्रांशी शेअर केली असावी आणि इथूनच माझ्या व शिल्पाच्या ब्रेकअपच्या अफवा फुटली असेल, असे मला वाटते. अलीकडे मी एका कामात बिझी होतो. माटुंग्याच्या आॅफिसमध्ये मी २०-२० तास काम करत होतो, असे राज म्हणाला. अशा अफवा पसरवणाºयांबद्दल त्याने रागही व्यक्त केला. याचाच अर्थ आता शिल्पा व राजमध्ये सर्वकाही सुरळीत आहे..