Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी फक्त तुझाच.." जान्हवी कपूरच्या फोटोवर रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:20 IST

जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअपही झालं होतं. पण, आता ते पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. जान्हवी आणि शिखर यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.  यादरम्यान शिखर पहाडियाने केलेल्या कमेंटमुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना पुन्हा एकदा जोर मिळाला आहे.

ऑरीने  एका पार्टीतला व्हि़डीओ शेअर केला होता. ज्यावर कमेंट जान्हवीला टॅग करत शिखरने लिहिले होते, मी फक्त तुझा आहे. मात्र नंतर त्याने हि कमेंट डिलीट केली. जान्हवी आणि शिखर अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. जान्हवीची बहीण खुशी कपूरच्या बर्थडे पार्टीत दोघेही एकत्र दिसले होते.

ऑरीने एका आठवड्यापूर्वी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या पार्टीत सुहाना खान, खुशी कपूर, सारा अली खान, राशा थडानी, अलाया एफ आणि निर्वाण खान यांसारख्या स्टार किड्सनी हजेरी लावली. या पार्टीत शिखर पहाडिया आणि त्याचा भाऊ वीर पहाडिया देखील उपस्थित होते. मात्र, जान्हवी या पार्टीत सहभागी झाली नव्हती.

या व्हिडिओमध्ये शिखर एका मुलीसोबत पोझ देत होता. कमेंट बॉक्समध्ये जान्हवीने शिखरला टॅग करून विचारले की गुलाबी ड्रेसमधील मुलगी कोण आहे? या कमेंटनंतर शिखरने तिला टॅग केलं आणि म्हटलं – मी फक्त तुझाच आहे. शिखरच्या या कमेंटनंतर दोघांचं रिलेशनशीप कन्फर्म झालं होतं. मात्र जान्हवी आणि शिखरने हे सगळे कमेंट्स डिलीट केलं.  

कोण आहे शिखर पहाडिया?शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांचा शिखर हा धाकटा मुलगा आहे. स्मृती या एक उद्योजिका आहेत. त्या चित्रपट निर्मात्याही आहेत.

टॅग्स :जान्हवी कपूर