Join us  

दीपिकावर शर्लिन चोप्राचा निशाणा, म्हणाली - जर 'माल' घेतला नाही तर मग.....

By अमित इंगोले | Published: September 26, 2020 9:12 AM

दीपिका यासाठी शुक्रवारी रात्रीच गोव्याहून मुंबईला आली. ड्रग्स चॅटमध्ये नाव आल्यावर दीपिकावर अनेकजण निशाणा साधत आहेत. यात आता शर्लिन चोप्राचाही समावेश झालाय. 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचं ड्रग चॅटमध्ये नाव समोर आल्यावर एनसीबीने तिला चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. एनसीबीची टीम दीपिकाची २६ सप्टेंबरला म्हणजे शनिवारी चौकशी करेल. दीपिका यासाठी शुक्रवारी रात्रीच गोव्याहून मुंबईला आली. ड्रग्स चॅटमध्ये नाव आल्यावर दीपिकावर अनेकजण निशाणा साधत आहेत. यात आता शर्लिन चोप्राचाही समावेश झालाय. 

शर्लिन चोप्राने तिच्या ट्विटर हॅंडलवर लिहिले की, 'जर तू 'माल'चं सेवन करत नाहीस, तर १२ वकिलांसोबत चर्चा करण्याची गरज का पडली? खरं बोलणाऱ्यांना पॅनिक किंवा एंग्झायटी अटॅक येत नाहीत. जिथे निडरता असेल तिथे भीतीसाठी कोणतीही जागा नसते'.

याआधीही शर्लिन चोप्रा ट्विट करत म्हणाली होती की, 'मला वाटतं की, दीपिका पादुकोणचं स्लोगन अपडेट करण्याची वेळ आली आहे. रिपीट आफ्टर मी नशेच्या पदार्थाचं सेवन करणं एक गुन्हा आहे. रिपीट आफ्टर मी 'माल' खूप जास्त दिवस न मिळाल्याने मूड स्विंग्स होतात, ज्याने नंतर डिप्रेशन येतं'.

शर्लिन चोप्राने दावा केला होता की, कोलकाता नाइट रायडर्सच्या पार्टीमध्ये तिने स्टार्सच्या पत्नींना पांढऱ्या पावडरचं सेवन करताना पाहिलं होतं. तसेच शर्लिन चोप्राने बॉलिवूडमध्ये ड्रग्सच्या वापरावरून अनेक गंभीर आरोप लावले आहेत. क्रिकेट खेळाडूंच्या पत्नीही ड्रग्सचं सेवन करत असल्याचा तिने दावा केलाय.

'त्या' व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमीन होती दीपिका

दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर, क्वॉन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश यांच्या व्हायरल झालेल्या २०१७च्या ड्रग्ज चॅट ग्रुपची दीपिका अ‍ॅडमिन असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, शनिवारी अमली पदार्थ नियंत्रक विभाग (एनसीबी) दीपिकाकडे याबाबत चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दीपिकाने स्वत: २०१७ मध्ये याच ग्रुपमधून ड्रग्जची मागणी केली होती. बॉलीवूडमधील तारेतारकांना चित्रपट आणि जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहा जया साहा आणि करिश्मा प्रकाशही या ग्रुपमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी करिश्माकडे याबाबत एनसीबीने चौकशी केली. तिने या ड्रग्ज संवादाबाबत कबुली दिल्याचेही समजते.

दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न  

श्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा!!

NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय

टॅग्स :शर्लिन चोप्रादीपिका पादुकोणबॉलिवूडअमली पदार्थ