Join us

शेखर कपूर यांच्या मुलीला करायची बॉलिवूड एंट्री; पण ‘ही’ असेल अट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 20:08 IST

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान, आमिर खान, सैफ अली खान, अजय देवगण, जॅकी श्रॉफ यांच्यासह श्रीदेवी, करिष्मा कपूर, सुष्मिता सेन, ...

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान, आमिर खान, सैफ अली खान, अजय देवगण, जॅकी श्रॉफ यांच्यासह श्रीदेवी, करिष्मा कपूर, सुष्मिता सेन, श्वेता तिवारी यांच्या मुली नेहमीच चर्चेत असतात. आता या स्टार डॉटर्समध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. होय, प्रसिद्ध दिग्गज निर्माते शेखर कपूर यांची टॅलेंटेड स्टार डॉटर कावेरी कपूर सध्या इंडस्ट्रीत येण्याच्या तयारीत आहे. कावेरीच्या डेब्यूबद्दल शेखर कपूर यांनी म्हटले की, माझी मुलगी मी दिलेली अट पूर्ण केल्यानंतरच तिच्या चित्रपट करिअरला सुरुवात करणार आहे. शेखर कपूर यांनी सांगितले की, कावेरी तेव्हाच चित्रपटात काम करणार जेव्हा  चित्रपटासाठी तिला संगीत तयार करण्याची संधी मिळेल. शेखर यांनी गेल्या गुरुवारी ट्विट करताना त्यांची ही अट सांगितली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी कावेरीला विचारले की, तू माझ्या चित्रपटात अभिनय करणार काय? यावर तिने स्पष्टपणे सांगितले की, मी तेव्हाच तुमच्या चित्रपटात अभिनय करणार जेव्हा मला संगीताची धूून तयार करण्याची संधी दिली जाईल. याला म्हणतात आत्मविश्वास!’ १६ वर्षीय कावेरी शेखर कपूूर आणि त्यांची पूर्व पत्नी आणि गायिका सूचित्रा कृष्णमूर्ती यांची मुलगी आहे. वयाच्या ११व्या वर्षी तिने तिचे पहिले गाणे लिहिले होते हे गाणे दोन वर्षांपूर्वीच लॉन्च करण्यात आले. जून २०१६ मध्ये कावेरीने तिचे पहिले गाणे ‘डिड यू नो’ यू-ट्यूबवर लॉन्च केले होते. ज्याला प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले होते. तिचे दुसरे गाणे आॅगस्ट २०१७ मध्ये रिलीज करण्यात आले होते.