Join us  

'जरा माझ्याही भावनांचा विचार करा'; बदललेल्या लूकवर कमेंट करणाऱ्याला शहनाजने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 1:17 PM

Shehnaaz gill: शहनाजने २०१९ मध्ये बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं, त्यावेळी तिची बरीच चर्चा झाली होती. यावेळीदेखील ती तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत येत आहे.

bigg boss 13 मुळे प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गील. मस्तीखोर अंदाज आणि लोभसवाणा चेहरा यांच्या जोरावर शहनाजने लाखो तरुणांची मनं जिंकून घेतली आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसमुळे शहनाजला नवी ओळख मिळाली आणि. पंजाबच्या कतरिनासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले. आज शहनाज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते. परंतु, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिचा अॅटिट्यूड बदलल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर तिला अनेकांनी ट्रोलही केलं आहे. या सगळ्याविषयी नुकतंच तिने भाष्य केलं असून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शहनाजने २०१९ मध्ये तिच्या लूकमध्ये बराच बदल केला होता. तिचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन त्यावेळी बरंच चर्चेत आलं होतं. तिच्या या बदललेल्या लूकवरुन अनेकांनी तिला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी हे सगळं करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर, शहनाजने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये याविषयी खुलासा करत इंडस्ट्रीत काम करण्यासाठी नाही तर फीट राहण्यासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केल्याचं म्हटलं होतं.

अलिकडेच शहनाजने पुन्हा एक लाइव्ह  सेशन घेत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका युजरने, 'तू पहिलेसारखीच हेल्दी छान वाटायचीस', अशी कमेंट केली होती. त्यावर, शहनाजने तिच्या भावना व्यक्त केल्या.

"मी तुमच्या भावना समजू शकते. पण, प्लीज माझ्याही भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा. मला इंडस्ट्रीत काम करायचं आहे. 'सब फर्स्ट क्लास इन चंदीगढ' या सिनेमात मी लीड रोल करतीये याचा आनंद आहेच. पण, मला लीड रोल मिळतोय की साईड रोल याच्यामुळे मला कोणता फरक पडत नाही. माझ्या भूमिकेला किती महत्त्व आहे हे मी पाहते", असं शहनाज म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी लीड रोल करु शकते हा विश्वास माझ्यावर दाखवल्यामुळे मी मुराद खेतानी सरांचे आभार मानते." दरम्यान, या सिनेमात शहनाजसोबत अभिनेता वरुण शर्मा स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :शेहनाझ गिलबॉलिवूडबिग बॉससेलिब्रिटीसिनेमा