Join us
Daily Top 2Weekly Top 5

'घटस्फोटाचा विषय कधीच संपला' शेफाली शाहच्या एक्स पतीने नात्यावर केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:25 IST

हर्ष छाया टीव्ही इंडस्ट्रीतील जुना अभिनेता आहे. २००० साली शेफाली आणि हर्षचा घटस्फोट झाला होता.

'दिल्ली क्राईम' सीरिज फेम अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) तिच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे ओळखली जाते. ५० वर्षीय अभिनेत्री आजही बोल्ड असो किंवा कोणतेही सीन असो आत्मविश्वासाने करते. तिच्या अभिनयाचे प्रेक्षक चाहते आहेत. शेफाली निर्माते विपुल शाह यांची पत्नी आहे. मात्र खूप कमी जणांना माहित असेल की शेफालीचा यापूर्वी घटस्फोट झाला आहे. टीव्ही अभिनेता हर्ष छायासोबत (Harsh Chhaya) तिने लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. आता बऱ्याच वर्षांनी हर्ष छाया यांनी घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

शेफाली आणि हर्ष यांचा 2000 साली घटस्फोट झाला. तो दोघांसाठीही फारच कठीण काळ होता. नुकतंच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत 57 वर्षीय हर्ष छाया म्हणाला, "घटस्फोटाचा विषय माझ्यासाठी संपला आहे. त्याला आता बराच काळ लोटला आहे. २०-२५ वर्ष झाली आहेत. आम्ही त्यानंतर एकमेकांशी कधीच बोललो नाही. पण उद्या जर आम्ही एकमेकांसमोर आलो तर मला अजिबातच विचित्र वाटणार नाही."

यापूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये हर्ष म्हणाले होते की, "वेगळं होणं नक्कीच वेदना देणारं असतं. पण आम्ही अचानक वेगळे झालो नाही. आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या मतभेदांमुळे आम्ही घटस्फोटापर्यंत पोहोचलो. मी आजही त्या गोष्टीकडे याच नजरेने पाहतो. दोन जण भेटले, प्रेमात पडले, लग्न केलं आणि वेगळे झाले. यात कोणीच काही करु शकत नाही. जर तुम्ही संसारात खूश नसाल तर वेगळं झालेलंच चांगलं. घटस्फोटानंतर मला खूप अवघड गेलं. मी थेरपी घेतली. यातून बाहेर पडायला मला सहा महिने लागले."

हर्ष छाया आणि शेफाली यांचं 1994 साली लग्न झालं होतं. हर्ष यांनी'तारा','साया',' जुस्तजू' या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. २००० साली त्यांचा घटस्फोट झाला. तर अभिनेत्याने काही वर्षांनी बंगाली अभिनेत्री सुनीता गुप्तासह लग्नगाठ बांधली.

टॅग्स :टिव्ही कलाकारवेबसीरिजघटस्फोटसेलिब्रिटी