शाहरुख खान आज बॉलिवूडचा 'किंग', 'बादशाह' म्हणून ओळखला जातो. टीव्हीवर 'फौजी' या मालिकेतून त्याने अभिनयाला सुरुवात केली होती. तेव्हा त्याच्यासोबत असे अनेक कलाकार होते जे आजही इंडस्ट्रीत काम करत आहेत. दरम्यान शाहरुख कॉमेजमध्ये असताना त्याच्यासोबत एक ज्युनिअर होती जी आज वेबसीरिज, सिनेमांमधून आपलं नाव गाजवत आहे. अभिनेत्री शाहरुखपेक्षा लहान असूनही तिने दोन सिनेमांमध्ये त्याच्या आईची भूमिका साकारली. कोण आहे ती?
ही अभिनेत्री आहे शीबा चड्ढा. 'रईस' आणि याआधी 'झिरो' या दोन सिनेमांमध्ये ती शाहरुख खानच्या आईच्या भूमिकेत दिसली. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत शीबा चड्ढा म्हणाली, "शाहरुख कॉलेजमध्ये मला सीनिअर होता. जेव्हा मी त्याच्यासोब, शूट केलं तेव्हा मी त्याला ही गोष्ट सांगायलाच विसरले. मी 'झिरो' आणि 'रईस' सिनेमात त्याच्या आईची भूमिका साकारली. 'रईस'मध्ये आमचे एकत्र सीन नव्हते कारण आमचे फ्लॅशबॅकमधले सीन होते. मात्र 'झिरो' मध्ये आम्ही एकत्र सीनमध्ये होतो. एका सीनमध्ये आम्हाला गळाभेट घ्यायची होती. तो सीन असा होता ज्यात त्याला मारहाण होत असते आणि मला त्याला वाचवायचं असतं. मी तुम्हाला स्पर्श केलेला चालेल ना? असं सीनच्या आधी शाहरुखने मला नम्रपणे विचारलं. तो खरंच जेंटलमन आहे."
शीबा चड्ढा ५३ वर्षांची आहे. तर शाहरुख ६० वर्षांचा आहे. दोघांमध्ये ७ वर्षांचं अंतर असूनही तिने शाहरुखच्या आईची भूमिका केली. शीबा आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे, वेबसीरिजमध्ये दिसी आहे. नुकतीच ती 'हक' सिनेमात दिसली. याशिवाय 'बंदीश बँडिट्स' या वेबसीरिजमध्येही तिची महत्वाची भूमिका होती. आपल्या अभिनयामुळे शीबाने इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शीबा आगामी 'रामायण' सिनेमातही दिसणार आहे. यात ती मंथरेच्या भूमिकेत आहे.