Join us
Daily Top 2Weekly Top 5

शत्रु्घ्न सिन्हांचे जीवनचरित्र ‘अ‍ॅनिथिंग बट खामोश’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 07:52 IST

‘अ‍ॅनिथिंग बट खामोश’ या जीवनचरित्राचे विमोचन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले

शत्रूघ्न सिन्हा यांच्या ‘अ‍ॅनिथिंग बट खामोश’ या जीवनचरित्राचे विमोचन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. ख्यातकीर्त स्थंभलेखक भारती एस प्रधान यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. अमिताभ बच्चन व शत्रुघ्न सिन्हा यांनी दोस्ताना या चित्रपटात एकत्र भूमिका केल्या होत्या. मात्र यानंतर दोघेही एकत्र कधीप पडद्यावर दिसले नाहीत. पुस्तक विमोचनाच्या निमित्ताने दोघेही एकाच मंचावर एकत्र आले हे विशेष. भारती प्रधान यांनी भारतातील सर्वांत प्रमाणिक जीवनचरित्र असल्याचा दावा यावेळी केला. सेलिब्रेटींच्या जीवनाविषयी उत्सुकता, भावुकता, नाटकीयता असते मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली स्पष्टवादी भूमिका कधीच सोडली नाही. 338 पानांचे हे पुस्तक देशभरात ‘बिहारी बाबू’ अशी ओळख असलेल्या शत्रुघ्न सिन्हा याच्याविषय निरंतर 7 वर्षे अभ्यास व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या 37 मुलाखतींच्या आधार घेऊन लिहले आहे.https://twitter.com/Thekkapoor/status/700789341581258752?ref_src=twsrc%5Etfwयासाठी 200 तासांचे रेकॉडिंग एैकावे लागले असे प्रधान म्हणाल्या. पुस्तक विमोचन करण्याची संधी दिल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून शत्रुघ्न सिन्हा यांचे आभार मानले. कार्यक्रमाला शत्रूघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी, पत्नी पूनम व भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.