Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा बेल्ट घेऊन शत्रुघ्न सिन्हांना मारण्यासाठी धावले होते शशी कपूर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 16:16 IST

वाचा मजेदार किस्सा

ठळक मुद्देमी लेटलतीफ होतो, अशी प्रांजळ कबुलीही शत्रुघ्न यांनी यावेळी दिली.

शत्रुघ्न सिन्हा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी त्यांचे सिनेमे, पडद्यावर त्यांनी जिवंत केलेल्या भूमिका चाहते विसरलेले नाहीत. शत्रुघ्न यांनी अनेक हिट सिनेमात काम केले. अनेक मल्टीस्टारर सिनेमातही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत त्यांच्या मैत्रीचे किस्से आजही ऐकवले जातात. यापैकी बरेच किस्से मजेशीर आहेत. शशी कपूर यांच्यासोबतचा असाच एक मजेशीर किस्सा खुद्द शत्रुघ्न यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितला.

होय, शत्रुघ्न यांच्या वागण्यामुळे शशी कपूर इतके वैतागले होते की एक दिवस ते त्यांना बेल्टने मारण्यासाठी धावले होते. शत्रुघ्न यांनी सांगितले, ‘एकदा मी सवयीनुसार सेटवर उशीरा पोहोचलो. शशी कपूर 3 तासांपासून माझी वाट पाहत होते. माझी वाट पाहून ते अक्षरश: वैतागले होते. मी सेटवर पोहोचलो तसा त्यांचा त्रासिक चेहरा मी ओळखला. याऊपरही त्यांना आणखी डिवचायचे म्हणून मी शेरेबाजी सुरु केली. मी वेळेचा पक्का आहे म्हणून लोक मला सिनेमात घेतात, असे मी शशी कपूर यांच्याकडे पाहून म्हणालो. यावर लाज वाटत नाही का, असे म्हणत बेल्ट घेऊन ते माझ्या मागे मारायला धावले होते. अर्थात हे सगळे गमतीगमतीत सुरु होते.’

मी लेटलतीफ होतो, अशी प्रांजळ कबुलीही शत्रुघ्न यांनी यावेळी दिली. हो, मी लेटलतीफ होतो. पण मी जाणीवपूर्वक उशीर करत नव्हतो. सेटवर येण्याआधी मला योगा पूर्ण करायचा असायचा आणि त्यातच मला उशीर व्हायचा. अनेकदा सकाळी 9 चा शॉट असायचा आणि मी दुपारी 12 वाजता सेटवर पोहोचायचो. पण सेटवर पोहोचल्यावर मी अगदी एका टेकमध्ये शॉट पूर्ण करायचो. मी वन टेक आर्टिस्ट होतो. यामुळे अनेकदा मी उशीरा काम सुरु करूनही वेळेत पॅकअप व्हायचे. कोणत्याही निर्मात्याने मी लेटलतीफ असल्याची कधीही तक्रार केली नाही. मी इतका खराब असतो तर मला सिनेमे मिळालेच नसते, असेही ते या मुलाखतीत म्हणाले.

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हाशशी कपूर